Transgenders 
web-special-news

लॉकडाऊनमुळे तृतीयपंथांवर ओढावलीये उपासमारीची वेळ !

जयश्री मोरे

भांडुप:  मुंबईसह Mumbai राज्यात संचारबंदी Curfew लागू करण्यात आलेली आहे. याचा परिणाम समाजातील विविध घटकांवर जाणवू लागला आहे. मुंबईत आज हजारो तृतीय पंथी Transgender रस्त्यावर फिरून, उत्सवात, घरगुती कार्यक्रमात शुभेच्छा देऊन आपले पोट भरत आहेत. Bad time of starvation on Transgender due to lockdown

कोरोनाला रोखण्यासाठी आधी केंद्राने Central Government लॉकडाऊन केला त्यानंतर आता राज्य सरकार State Government ने कडक निर्बंध लागू करून संचारबंदी केली आहे. याचा मोठा फटका या तृतीय पंथींना बसला आहे.

सण, उत्सव, लग्नात नाचणे, आठवडी बाजार, लोकलमधून प्रवाशांना बधाई देणे, दुकाने बंद आहे, सिग्नलला तुरळक गाड्या आहेत. पण टाळी वाजवू शकत  नाही, कारण संचारबंदी आहे. टाळी वाजली नाही तर पोटाची खळगी भरू शकत नाही. अश्या स्थितीत शासनाची मदत पोहचत नाही, काही सामाजिक संस्था Social organization मदत करीत आहेत मात्र त्या तुटपुंज्या आहेत. यामुळे या तृतीयपंथींवर बेघर होण्याची आणि उपासमारीची वेळ आली आहे. भांडुपच्या Bhandup सोनापूर विभागात असे चाळीस ते पन्नास तृतीय पंथी रहातात. यातील काहींना घर भाडे न भरल्याने घरमालकाने घर खाली करण्यास सांगितले आहे. अनेकांना उपासमारीची वेळ आहे. 

देवआमृत फाउंडेशनतर्फे Devamrut Foundation त्यांना काही दिवस पुरेल अश्या रेशन ची व्यवस्था करून देण्यात आली असली तरी ही मदत तुटपुंजी आहे. त्यामुळे सरकार ने पुढे येऊन तात्काळ तृतीय पंथीना आर्थिक मदत करावी अशी मागणी हे तृतीय पंथी आणि सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. 

Edited By- Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; वाहनात गॅस भरण्यावरून दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Politics: महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी

Bihar Election : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; सत्ताधारी पक्षाने माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना केलं निलंबित

Eye Health: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

SCROLL FOR NEXT