Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : रील व्हिडिओ बनवण्यासाठी डॅमवर साडी नेसून आली; पाय घसरला आणि तरुणी पाण्यात पडली, पाहा VIDEO

Viral Video : व्हिडिओ शूट करू लागते. व्हिडिओ बनवत असताना या तरुणीने सुंदर साडी सुद्धा नेसली आहे. सध्या साडी नेसून पावसात किंवा पाण्यात फोटोशूट करण्याचा ट्रेंड सुरू आहे.

Ruchika Jadhav

पावसामुळे सध्या सर्वत्र नद्या, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. तर अनेक जण डॅम किंवा धबधब्यावर पोहण्यासाठी येत आहेत. येथे आल्यावर स्वत:ची काळजी स्वतालाच घ्यावी लागते. मात्र अनेकजण मजा मस्तीच्या नादात पाण्यात पोहण्यासाठी जातात आणि स्वताचा जीव गमावून बसतात. आता देखील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी डॅमवर पोहण्यासाठी आली आहे. येथे पोहताना तिला रिल व्हिडिओ करण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे ती डॅमच्या मधोमध उभी राहून रील व्हिडिओ शूट करू लागते. व्हिडिओ बनवत असताना या तरुणीने सुंदर साडी सुद्धा नेसली आहे. सध्या साडी नेसून पावसात किंवा पाण्यात फोटोशूट करण्याचा ट्रेंड सुरू आहे.

त्यामुळे ही तरुणी देखील असंच फोटोशूट करत असते. फोटोशूट करताना ती डॅमवर उभी राहते. मात्र तेथून पाय घसरून ती खाली पडताना दिसत आहे. पाय घसरून पडलेली ही तरुणी एक व्हिडिओ क्रियेटर आहे. सुरूवातीला व्हिडिओ पाहून ती पाण्यात वाहून गेली की काय अशी शंका मनात येते. मात्र या तरुणीने अशा पद्धतीने उडी मारून स्वत:चा एक रील व्हिडिओ शूट केला आहे.

पावसाळ्यात व्यक्ती नदी, धरण, धबधबे अशा विविध ठिकाणी पोहण्यासाठी जातात. येथे आल्यावर एन्जॉय करत असताना प्रत्येक व्यक्तीने आपली स्वताची काळजी घ्यायला हावी. मात्र उत्साहाच्या भरात गेल्या २ ते ३ दिवसांत काही जण पाण्यात वाहून गेलेत. लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील तब्बल ५ जण पाण्यात वाहून गेले आहेत. तसेच ताम्हीणी घाटात देखील मित्रांसह पोहण्यासाठी गेलेला एक तरुण वाहून गेलाय. पुण्यामध्ये देखील २ तरुण पाण्यामध्ये वाहून गेल्याची घटना घडलीये.

अशा काळजात धडकी भरवणाऱ्या घटना सध्या सर्वत्र घडताना दिसत आहेत. पाण्यात वाहून जाऊ नये म्हणून ही काळजी घ्या.

जास्त खोल पाण्यात उतरू नका.

कमरेपर्यंत असलेल्या पाण्यात जाणार असाल तर आधीच झाडाला एक रशी बांधून तिचं दुसरं टोक स्वतालाही बांधून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT