Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: छम्मक छल्लो गाण्यावर डान्स करणारी ही तरुणी आहे तरी कोण? VIDEO पाहून तुमचीही नजर हटणार नाही

Dance Video: शाहरुख खान आणि करीना कपूर अभिनित रावन या चित्रपटातील छम्मक छल्लो या गाण्यावर तरुणी डान्स करत आहे. सोशल मीडियावर @hemu_thapliyal या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Girl Dance:

लग्न समारंभ किंवा एखाद्या सोहळ्यात डान्स करायला सर्वांनाच आवडतं. सोशल मीडियावर भन्नाट डान्सचे आजवर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यातील काही व्हिडीओ तर इतके ट्रेंन्डमध्ये येतात की अनेक जण अशा पद्धतीच्या स्टेप्ससह व्हिडीओ बनवण्यास सुरुवात करतात. अशात सोशल मीडियावर एका तरुणीच्या डान्सचा सुंदर व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणीने सुंदर गुलाबी साडी नेसली आहे. गुलाबी साडी नेसून तिने लूक पूर्ण करण्यासाठी लाइट मेकअप केलाय आणि केस मोकळे सोडलेत. तिच्या आजुबाजूला अन्य काही मुली देखील आहेत. मात्र तरुणीच्या डान्समुळे सर्वांची नजर तिच्यावरच आहे. तिच्या डान्स स्टेप्सने अनेकांची मने जिंकलीत.

शाहरुख खान आणि करीना कपूर अभिनित रावन या चित्रपटातील छम्मक छल्लो या गाण्यावर तरुणी डान्स करत आहे. ती डान्स करण्यास सुरुवात करते त्यावेळी तिच्या शेजारी आणखी एक मुलगी उभी असते. सुरुवातीला या दोघी डान्स करतील असं वाटतं. मात्र नंतर तरुणीचा डान्स पाहून दुसरी मुलगी थोडी बाजूला होते.

सोशल मीडियावर @hemu_thapliyal या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या तरुणीचं नाव हिमानी थपलियाल आहे. ती स्वत: एक आर्टीस्ट असून कॉस्चुम डिझायनर आहे. तिला डान्सची देखील फार आवड असल्याने ती नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर डान्सचे व्हिडीओ पोस्ट करत असते.

सोशल मीडियावर या व्हिडीओला ८ लाखांहून अधिक व्हुव्ज मिळाले आहेत. सोशल मीडियावर या आधी देखील एक कपल डान्स व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला होता. त्यात हुआ छोकरा जवां रे... या गाण्यावर एक तरुण आणि तरुणीने डान्स केला होता. हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. अनेकांनी आपल्या बेस्ट फ्रेंडसोबत असा डान्स करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT