Viral Stunt Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बाईक स्टंटचा प्रयत्न जीवावर बेतला, तोंडावर आपटल्याने तरुण जखमी; VIDEO

Viral Stunt Video: पुण्यात एक तरुण बाईकवर स्टंट करताना तोंडावर आपटला. हेल्मेट न घातल्याने त्याच्या चेहऱ्यावर गंभीर जखम झाली. अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे

Tanvi Pol

Youth Accident Video: तरुण असो तरुणी यावर्गात बाईक स्टंटचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. सोशल मीडियावर थोडं नाव कमवण्यासाठी किंवा व्हायरल व्हिडिओसाठी तरुण बेधडकपणे आपला जीव धोक्यात घालून स्टंट करताना दिसतात. असाच एक धक्कादायक प्रकार नुकताच समोर आलेला आहे. स्टंट करताना तोल जाऊन एका तरुणाचा दुचाकीवरून तोल गेल्याने तो थेट तोंडावर आपटला. या अपघाताचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

नेमके घडले तरी काय?

घटनेतील तरुणाने रस्त्यावर गर्दी नसलेल्या ठिकाणी आपल्या बाईकवर स्टंट(Stunt) करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्टंट करताना त्याचा तोल गेला आणि दुचाकीसह तो रस्त्यावर आपटला. त्याचं तोंड थेट रस्तावर आदळल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. काही वेळातच आजूबाजूचे लोक धावत आले आणि त्याला मदतीसाठी उचलले. प्रथमदर्शनी वाटलं की हा अपघात फारसा गंभीर नाही, पण पुढील तपासणीत समजलं की त्याला जबड्याला, कपाळाला आणि नाकाला मोठी इजा झाली आहे.

हा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील @Deadlykalesh या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. हा व्हायरल व्हिडिओ कधीचा आहे आणि कुठला आहे ते अद्याप समजले नाही,मात्र सध्या या व्हिडिओची चर्चा सर्वत्र होत आहे.

या स्टंटचा व्हिडीओ(Video) कॅमेऱ्यात कैद झाला आणि अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी या तरुणाच्या मूर्खपणावर टीका केली तर काहींनी स्टंट करताना योग्य सुरक्षा साधनांचा वापर न केल्याबद्दल संताप व्यक्त केला. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं की त्या तरुणाने हेल्मेट घातलेलं नव्हतं. ही मोठी चूक ठरली. हेल्मेट असतं तर त्याचं डोकं वाचलं असतं.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT