Shocking News Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking News: आधी कानाखाली पेटवली, नंतर शिव्या घातल्या, दारूच्या नशेत महिलेकडून सासूला अमानुष मारहाण; VIDEO व्हायरल

Woman Thrashes Mother In Law: पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातील कोठा गावात धक्कादायक प्रकार घडला आहे. एका सुनेने तिच्या वयोवृद्ध मारहाण केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर सध्या एका घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. एका सुनेने तिच्या वयोवृद्ध सासूला मारल्याची घटना आहे. पंजाबमधील हे प्रकरण असून राज्य महिला आयोगाने या संपूर्ण घटनेची माहिती मिळवत आरोपी महिलेवर कारवाई केली आहे.

पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातील कोठा गावात धक्कादायक प्रकार घडला आहे. एका सुनेने तिच्या वयोवृद्ध मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला वयोवृद्ध महिलेचे केस ओढताना, शिव्या देताना दिसत आहे. एवढंच नाही तर ही महिला कानाखाली मारते आहे. स्टीलचा ग्लास फेकून मारत आहे. मारणारी महिला दुसरी तिसरी कोणी नसून सून असल्याची माहिती आहे.

एका कुटुंबातील हा प्रकार आहे. सुनेने वयोवृद्ध सासूला मारलं आहे. मारहाण करणाऱ्या सुनेचे नाव हरजीत कौर आहे. तर पिडीत वयोवृद्ध महिलेचे नाव गुरभजन कौर आहे. सुनेने मारहाण केल्यामुळे गुरभजन कौरची अवस्था वाईट झाली आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ हरजीतचा मुलगा काढत आहे.

'बस कर आई, आजील सोड, नको मारू असं' म्हणत आहे. आईच्या भितीपोटी हा मुलगा आजीला वाचवायला सुद्धा येत नाही आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेची माहिती माहिला आयोगाला देण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाण करणाऱ्या या सुनेवर कडक कारवाई केली जाणार आहे.

'वृद्धांची सुरक्षा आणि त्याचे हक्क मिळवून देणं' हे आमचं प्रथम प्राधान्य आहे असं गुरदासपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणाल्या, पुढे त्यांनी वृद्ध महिलेला आपल्या सुनेची भिती होती. ही महिला नशेत मारहाण करत असल्याचा खुलासा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT