Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: अरेरे! चक्क म्हशीच्या पाठीवर उभं राहून केलाय डान्स; VIDEO पाहून नेटकरी हैराण

Dance Viral Video: एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात दोन महिलांनी व्हायरल होण्यासाठी चक्क म्हशींवर उभं राहून डान्स केलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Woman Dance Viral Video

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील व्हिडिओ काही व्हिडिओ तरुणाईच्या थरारक स्टंटचे असतात तर काही व्हिडिओ वयोरुद्ध व्यक्तींच्या डान्सचे असतात. व्हायरल व्हिडिओ पाहून कधी काळजाचा थरकाप उडतो तर हसून हसून पोट दुखते. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विचित्र लोकांचे भन्नाट व्हिडिओ पाहायला मिळत असतात. अशात एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात दोन महिलांनी व्हायरल होण्यासाठी चक्क म्हशींवर उभं राहून डान्स केलाय.हा व्हिडिओ पाहणारा प्रत्येकजण डोक्याला हात लावल्याशिवाय राहणार नाही.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, दोन महिला साडीमध्ये म्हशीवर उभ्या आहेत. एका महिलेने गुलाबी आणि दुसऱ्या महिलेने पिवळ्या रंगाची साडी नेसलेली आहे. डान्स करताना दोघींची एनर्जी भल्याभल्या डान्सर्सला लाजवेल अशी आहे. तोल साभांळत दोघी उड्यासुद्धा मारत आहेत.

व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील prince__rajasthaniया अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ राजस्थानमधील असून जूना असल्याचे समजते.

महिलांनी म्हशींवर उभं राहून केलेल्या डान्सवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे तर काही नेटकऱ्यांना हसू आवरेनासे झाले आहे.या व्हिडिओवर लोक मजेशीर कमेंटही करत आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले आहे की,'आजपर्यंत नागिन डान्स पाहिला आणि आज हा डान्सही बघितला'.अशा विविध प्रतिक्रिया व्हिडिओवर येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर महत्वाची बैठक सुरू

Maharashtra News Live Update: उजनी धरणातील पाण्याचे ऑगस्टपर्यंत नियोजन

Gold Rate Today: अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; सुवर्णनगरीतील २२ अन् २४ कॅरेटचे दर किती?

CBSE Class 12 Result 2026: बारावीचा निकाल कधी लागणार? मोठी अपडेट समोर; मोबाइलवर रिझल्ट कसा पाहाल?

Bigg Boss Marathi 6: 'मला राकेश बापटच्या मुलांची आई व्हायचंय...'; राखी सावंतचं व्यक्त केली धक्कादायक इच्छा

SCROLL FOR NEXT