विमान हजारो फूट उंचीवरून पुढे जात असताना एका महिलेच्या कृत्यानं मोठा गोंधळ उडाला. महिलेने प्रवाशांसमोर अंगावरील कपडे काढून टाकत डान्स सुरू केला. महिलेचं कृत्य पाहून विमानातील अनेकांच्या भुवया उंचावल्या. ही घटना घडलीय अमेरिकेतील बाल्टिमोर येथे. बाल्टिमोरवरून मियामीला हे विमान जात होते. एका प्रवाशी महिलेने संगळे कपडे काढले आणि इतर प्रवाशांसमोर अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली.
जमिनीपासून हजारो फूट उंचीवर हा विचित्र प्रकार घडला. अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात एका महिलेने सगळे कपडे काढत सहप्रवाशांसमोर अश्लील वर्तन केले. यामुळे क्रू मेंबर्सनी कॉकपिटला सतर्क केले आणि पोलिसांची मदत मागितली. हा गोंधळ इतका गंभीर होता की प्रमुख फ्लाइट अटेंडंटला कॉकपिट क्रूला सतर्क करावे लागले, त्यामुळे विमान मियामीकडे जात असताना विमानातून एअरलाइनच्या ऑपरेशन्स सेंटरमध्ये माहिती देण्यात आली.
अमेरिकन एअरलाइन्सच्या इंटिग्रेटेड ऑपरेशन्स सेंटरला पाठवलेल्या एअरक्राफ्ट कम्युनिकेशन्स अॅड्रेसिंग अँड रिपोर्टिंग सिस्टीमच्या माहितीनुसार, 9D सीटवर बसलेल्या एका महिला प्रवाशाने तिचे सर्व कपडे काढले होते आणि इतर प्रवाशांना ती अश्लील वर्तन करत होती.
विमानातील कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती एअरलाइनच्या ऑपरेशन्स सेंटरला दिली. वैमानिकांनी विमानाचा मार्ग न वळवता एअरलाइनच्या ग्राउंड स्टाफशी समन्वय करून फ्लोरिडाकडे जाणे सुरूच ठेवले. विमान मियामीला पोहोचेपर्यंत अधिकारी गेटवर वाट पाहत होते. विमान उतरताच महिलेला ताब्यात घेण्यात आले. स्थानिक वेळेनुसार रात्री ११.२३ च्या सुमारास हे विमान मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल एन मधील गेट D2 वर पोहोचले होते.
विमानाच्या ACARS कम्युनिकेशन्सच्या माध्यमातून महिलेने गोंधळ घातल्याची घटना घडली. ११ सप्टेंबर रोजी अमेरिकन एअरलाइन्सच्या AA1779 या फ्लाइटमध्ये ही घटना घडली होती. एअरबस A319 विमानाने स्थानिक वेळेनुसार रात्री ९ च्या काही वेळानंतर बाल्टिमोर/वॉशिंग्टन इंटरनॅशनल थुरगुड मार्शल विमानतळावरून उड्डाण केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.