Viral Video saam tv
व्हायरल न्यूज

Mumbai Local Video : रेल्वे स्थानकावर रेलिंग ओलांडताना झाली फजिती, थेट डोक्यावर पडला, पाहा व्हायरल VIDEO

Viral Video On Boisar Railway Station: बोईसर स्टेशनवरील रेलिंग ओलांडणारा प्रवाशाचा एक व्हिडीओ अतिशय वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना एका प्रवाशाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Dhanshri Shintre

पालघर, पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकाजवळ एक धोकादायक आणि जीवघेण्या प्रवासाचा प्रकार उघडकीस आला आहे. रेल्वे ट्रॅक ओलांडू नये यासाठी लावलेले रेलिंग प्रवाशांनी धोकादायक पद्धतीने ओलांडले आहेत. ही घटना एका प्रवाशाच्या कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यात एक प्रवासी रेलिंगवरून थेट रेल्वे ट्रॅकच्या शेजारी पडताना दिसत आहे.

रेल्वे स्थानकाच्या परिसरात हा प्रकार घडला असला तरी, रेल्वे पोलिसांनी या धोकादायक घटनेकडे दुर्लक्ष केले आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता एक व्यक्ती रेलिंग ओलांडताना दिसत आहे. त्या व्यक्ती रेलिंग ओलांडताना मागच्या साईडला तोल जातो आणि ती व्यक्ती मागे डोक्यावर पडते.

रेल्वे स्थानकावर लावलेले रेलिंग या प्रकारे ओलांडले जात असताना, प्रवाशांचे जीवन धोक्यात येत आहे. त्यांना ट्रॅक ओलांडणे किंवा सुरक्षित मार्गाचा वापर न करता, रेलिंगमधून घुसून ट्रॅकवर जाऊन अपघाताचा धोका वाढला जात आहे. या प्रकाराची कॅमेऱ्यातील व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे आणि यावर सामाजिक माध्यमांवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन आणि पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडीओ 'saamtvnews' या इन्स्टाग्राम अकांऊटवर शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडीओला अनेक प्रतिक्रिया येत आहे. एका यूजर्सने लिहिले की, 'क्या ओलांडू बनेगा रे तू' ही प्रतिक्रिया वाचून अनेकांना हसू येईल. तर दूसऱ्या यूजर्सने लिहिले की, 'नाही जमत तर कशाला उगीच स्वतःच्या जीवाशी खेळायचं'. असे अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Pink Saree: नवविवाहीत स्त्रीयांनी श्रावणात सणासुदींसाठी नेसा 'ही' सुंदर गुलाबी साडी

Lonavala-Khandala Tourism: 'या' विकेंडला मस्त भिजायचंय? लोणावळा-खंडाळ्यातील 'या' धबधब्यांची नाव आताच नोट करा

Shefali Jariwala Property: शेफाली जरीवालाची एकूण संपत्ती किती? वारसदार कोण?

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT