Dog Attack On Bride Saam TV
व्हायरल न्यूज

Dog Attack On Bride: भरलग्नमंडपात नवरीमागे कुत्रा लागला; पाहुण्यांची पळापळ, पाहा VIDEO

Viral Video: नवरी पुढे पळतेय आणि कुत्रा तिच्या मागे मागे पळत आहे. नवरीने घागरा घातला असल्याने तिला व्यवस्थित पळता देखील येत नाही. मंडपात पुजेचं सामान ठेवलेलं आहे. त्यातुनच हे दोघे पळत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Wedding Video:

लग्न समारंभात नवरी आणि नवरदेव दोघेही फार खूश असतात. आपला विवाह सोहळा निर्विघ्न पार पडावा असं सर्वांनाच वाटतं. त्यासाठी प्रत्येक जण फोटोशूट, सुंदर कपडे, फायर गन अशा विविध आकर्षक गोष्टी लग्नात करण्याचा प्रयत्न करतात. लग्नात नवरा आणि नवरीसोबत कधीकधी काही मजेशीर घटना देखील घडतात. या घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आता देखील सोशल एका लग्नसमारंभातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओपाहून सर्वचजण चकित झालेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नमंडपात नवरीच्या मागे एक कुत्रा लागला आहे. नवरी पुढे पळतेय आणि कुत्रा तिच्या मागे मागे पळत आहे. नवरीने घागरा घातला असल्याने तिला व्यवस्थित पळता देखील येत नाही. मंडपात पुजेचं सामान ठेवलेलं आहे. त्यातुनच हे दोघे पळत आहेत.

अशात पुजेसाठी ठेवलाल कलश आणि कुरमुऱ्यांचे ताट खाली पडते. मंडपात सगळीकडे हे कुरमुरे आणि तांदुळ पसरले जातात. नवरीला कुत्र्यापासून दूर करण्यासाठी सर्वजण धावपळ करतात. मात्र कुत्रा काही ऐकायला तयार नाही. शेवटी नवरदेव पुढे येतो आणि आपल्या पत्नीला कुत्र्यापासून वाचवतो. त्यानंतर कुत्रा तेथून निघून जातो.

नवरीच्या मागे कुत्रा लागतो तेव्हा लग्नात आलेल्या व्यक्ती त्याचे फोटोशूट करत आहेत. पोटोशूट करतानाचे देखील या व्हिडीओत कैद झालेय. त्यामुळे हा व्हिडीओ एखाद्या मालिकेच्या शुटींगचा असावा अशी शंका काहींनी व्यक्त केलीये. @bridal_lehenga_designn या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

नवरीने प्रियकराला फसवून लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे तिच्या एक्सने तिच्यावर कुत्रा सोडला अशी कमेंट एकाने केलीये. तर अन्य काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी पोस्ट केलेत. आतापर्यंत या व्हिडीओला लाखोंच्या घरात व्हुव्ज मिळालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंचा पाटलांना मोठा धक्का! TDCC निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय, मोठा उलटफेर

सौदी अरबमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कार आणि चाकू SIT कडून जप्त

SCROLL FOR NEXT