Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: मुंबई एसी लोकल ट्रेनमध्ये बिन मौसम बरसात...VIDEO पाहून प्रवासी झाले चकीत

Mumbai Local Train: अशातच सोमवारी पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलच्या छतातून चक्क पाणी गळू लागले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Western Railway Viral Video

कधी तांत्रिक बिघाड तर कधी प्रवाशांच्या गर्दीमुळे होणारा उकाडा, तसेच प्रवासी लटकत असल्याने दरवाजे बंद न झाल्याने पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल सातत्याने चर्चेत असते. अशातच सोमवारी पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलच्या छतातून चक्क पाणी गळू लागले.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चर्चगेट ते विरार या जलद वातानुकूलित लोकलमध्ये पाणी थेंब थेंब असे गळू लागले.मात्र अंधेरी स्थानकाच्या पुढे जाताच पाणी संताताधरेच्या रुपात बरसू लागले.पाऊस नसतानाही लोकलच्या छतातून पाणी गळू लागल्यामुळे प्रवासी पुरते हैराण झाले. सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की,' एक एसी लोकल आहे. अशातच चक्क त्या लोकल डब्यातील छतावरुन पाणी पडत असल्याचे दिसत आहे. या ट्रेनमध्ये आपल्याला एक प्रवासी दिसून आलेला आहे. संपूर्ण डब्यात पाणी पाणी झाले आहे.

व्हायरल व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्म एक्स(ट्वीटर) वरील@Ruchika66964659या नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या आधीही मुंबईच्या महिलांच्या डब्ब्यात पाण्याच्या धार सुरु होती. अखेरीस या लोकलमधील एका प्रवाशाने संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय.

सर्व माध्यमामध्ये व्हिडिओ तूफान व्हायरल होतोय. व्हिडिओ मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत असून अनेक व्ह्यूजपण मिळत आहेत. व्हिडिओ पाहून विविध माध्यमातून अनेक संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

SCROLL FOR NEXT