Wardha News Car hit Bike Husband Wife Death on the Spot Shocking Accident Video  Saam TV
व्हायरल न्यूज

Accident News: शॉर्टकट जीवावर बेतला, भरधाव कार दुचाकीला धडकली; पती-पत्नी हवेतच उडाले, भयानक VIDEO

Satish Daud

चेतन व्यास, साम टीव्ही

Wardha Accident CCTV VIDEO

राँग साईट वाहने चालवून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करू नका, अशा सूचनांचे फलक महामार्गावर लावलेले असतात. मात्र, अनेकजण सर्रास याकडे दुर्लक्ष करतात. अंतर मी व्हावे म्हणून शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करतात. परिणामी हा शॉर्टकट त्यांच्या जीवावर बेततो. असाच काहीसा प्रकार एका पती-पत्नीसोबत घडला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुचाकीवरून जात असताना एका पती-पत्नीने महामार्गावरून शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, समोरून भरधाव वेगात येणाऱ्या कारने त्यांना उडवलं. अपघात इतका भीषण होता, की पती-पत्नी उंच हवेत उडाले. या घटनेत दोघांचाही जागेवरच जीव गेला.

काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना वर्धा जिल्ह्यातील नागपूर-तुळजापूर महामार्गावरील पवनार परिसरात बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेचा सीसीटीव्ही फुजेट समोर आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना धडकी भरली आहे.

अवधूत वैरागडे (वय ६० वर्ष) व चित्रा वैरागडे (वय ५५ वर्ष) दोघेही रा. केळझर, असे मृत्युमुखी पडलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, अवधूत वैरागडे व त्यांच्या पत्नी चित्रा हे दोघेही दुचाकीने वर्धा येथून (Wardha News) नागपूरकडे जात होते.

अवधूत हे चुकीच्या दिशेने दुचाकी चालवत महामार्गावरील दुभाजक ओलांडण्याच्या प्रयत्नात होते. याचदरम्यान नागपूरकडून वर्ध्याकडे जात असलेल्या कारने दुचाकीला धडक (Car Accident) दिली. काळजाचा ठोका चुकवणारा हा अपघात परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medical College : वैद्यकीय शिक्षण महागलं, 5 पट शुल्क वाढ!

IND vs BAN, 1st Test: रोहित- विराट पुन्हा एकदा फ्लॉप! गिलने मोर्चा सांभाळला; टीम इंडिया आघाडीवर,पाहा Scorecard

Matheran Toy Train : माथेरान ट्रेन आता पावसाळ्यातही धावणार; मध्य रेल्वेचा प्लान आहे तरी काय? वाचा

Maharashtra News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाशिम दौरा रद्द

Esha Gupta: ईशाच्या सौंदर्याचा जलवा; फोटोंवरुन नजर हटेना!

SCROLL FOR NEXT