wardha  Saam tv
व्हायरल न्यूज

Street Fight : अर्रर्र...भर रस्त्यात २ गटांची फ्री स्टाईल हाणामारी; महिलांचेही दिसले आक्रमक रुप, VIDEO VIRAL

Street Fight Between Two Groups in Wardha : वर्ध्यात दोन गटाची तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. भर रस्त्यातच दोन गटाची हाणामारी झाली. यामध्ये महिलांचाही समावेश पाहायला मिळत आहे.

Vishal Gangurde

चेतन व्यास, साम टीव्ही

वर्धा शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या सोशालिस्ट चौकातील एका शॉप चालक आणि लगतच्याच एका कार्यालयातील सदस्यांमध्ये चांगलाच वाद उफाळला. आज दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास दोन्ही गट आमने-सामने येत चांगलाच राडा केला. या दोन गटाच्या लोकांनी एकमेकांना मारहाण केली. या घटनेमुळे काही वेळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यावरील हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वर्ध्यातील सोशालिस्ट चौकात आयुर्वेदीक औषधीचे दुकान आहे. तसेच लगतच एका ब्लॉकमध्ये महिला वकिलाचे कार्यालय आहे. या दोघांमध्ये मागील काही महिन्यांपासून वाद सुरु आहे. आज दुपारच्या सुमारास दोन्ही गटात चांगलीच हाणामारी झाली. या हाणामारीत महिलांचे देखील आक्रमक रुप नागरिकांनी उघड्या डोळ्याने अनुभवले. रस्त्यावरील हाणामारीनंतर घटनास्थळी शहर पोलिसांचे चमू दाखल झाल्याचेही पाहायला मिळाले.

रस्त्यावर आयुर्वेदीक औषधीच्या दुकानाचा फलकही तुटून पडला होता. मुख्य मार्गावर दुपारच्या सुमारास झालेल्या हाणामारीचे व्हिडिओ विविध सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडिओमध्ये मारहाण झाल्याचा संपूर्ण प्रकार कैद झाला. शहरात दिवसभर याच घटनेची चर्चा रंगली होती. यावर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे शहर पोलिसांकडून सांगण्यात आले.

व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसत आहे?

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दोन गटांची हाणामारी पाहायला मिळत आहे. यात काही महिला देखील दिसत आहे. ही महिला एका पुरुषाला मारताना दिसत आहे. काही महिला त्यांचा वाद सोडवताना दिसत आहे. या चौघांच्या हाणामारीमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्यावर सुरु असणाऱ्या पुरुषांची हाणामारी रोखण्यासाठी कोणीही पुढे येताना दिसत नाही. चौघेही एकमेकांना मारहाण करत आहे. चौघांच्या हाणामारीमुळे रस्त्यावर एकच तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT