Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: काय वेळ आली... दारासमोर ठेवलेल्या क्रॉक्सवर हात केला साफ, CCTV व्हिडीओ व्हायरल

CCTV Video: सोशल मीडियावर सध्या एका अजब गोष्टीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका वस्तूची घराबाहेरुन चोरी झालेली आहे. मात्र नेमके काय गेले चोरीला तुम्ही पहा.

Tanvi Pol

Thief Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हायरल व्हिडिओ अनेकदा थरकाप उडवणाऱ्या अपघांताचे असतात तर कधी घरात झालेल्या चोरीचे असतात,त्यातही चोरीची काही घटना अशा असतात ज्या पाहून डोकं अक्षरशा: फिरुन जात,त्याच संबंधित एक व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे, ज्यात चोराने घराबाहेरून फक्त एका क्रॉक्स अर्थात चप्पलची चोरी केलेली आहे.

काय घडले?

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एका इमारतीच्या आतील परिसर दिसत आहे. व्हिडिओत पाहिले तर प्लॅट बाहेरील एरिया दिसत आहे जिथे प्रत्येकाच्या घराचे दरवाजे बंद आहेत. काही वेळात घराबाहेर असलेल्या लिफ्टमधून एक व्यक्ती बाहेर पडतो आणि थेट एका घराबाहेर असलेल्या क्रॉक्स पायात घालून परत जातो, अर्थात लिफ्टमधून आलेल्या व्यक्तीने घराबाहेरुन क्रॉक्स या चप्पलची चोरी केलेली आहे. व्हिडिओत त्या व्यक्तीची ओळख होऊ शकलेली नाही मात्र संपूर्ण विचित्र घटना प्लॅटबाहेर असलेल्या सीसीटीव्हीत कैद झालीय.

सीसीटीव्हीचा व्हिडिओ सध्या 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो एक्सच्या ''@gharkekalesh'' या अकाउंटवर अपलोड केलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,''बिस्लेरी डिलिव्हरी बॉयने ग्रेटर नोएडा पश्चिम उत्तर प्रदेशातील एका सोसायटीमधील फ्लॅटच्या बाहेरून एका रहिवाशाचे नवीन क्रॉक्स चोरले'',असे लिहिले आहे.

उत्तर प्रदेशातील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेटबॉक्समध्ये अनेक कमेट्स केलेल्या आहेत. पहिल्या एका यूजरने लिहिले,''क्या चोर बनेगा तु''तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''शब्द नाहीत काही बोलण्यासाठी'',तर काही यूजर्संनी गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : चोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT