Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Brothers Fight Viral Video: जमिनीच्या तुकड्यासाठी भाऊ जीवावर उठला! थेट अंगावर घातला ट्रॅक्टर; भयंकर व्हिडिओ....

Gangappa Pujari

Brothers Fight Viral Video: जमिनीच्या वादातून होणाऱ्या हत्या, मारामाऱ्या हे काही अलीकडच्या काळात नवीन नाही. जमिनीच्या छोट्याशा तुकड्यासाठी अनेकदा रक्ताची नातीच एकमेकांची वैरी झाल्याची अनेक उदाहरणे तुम्ही आजपर्यंत ऐकली असतील.

मात्र सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुमच्याही अंगावर काटा उभा राहील. कारण जमिनीच्या वादातून भावानेच भावाच्या अंगावर थेट ट्रॅक्टर घातल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेवू...

सोशल मीडियावर आपल्याला असंख्य प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. जे पाहून अनेकदा आपल्या अंगावर काटा उभा राहतो. सध्या असाच एक काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक भाऊ आपल्याच सख्ख्या भावाच्या अंगावर ट्रॅक्टर घालताना दिसत आहे.

जमिनीच्या वादातून त्याने हे कृत्य केले असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये दुसऱ्या भावाला कोणतीही इजा झाली नसली तरी हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी मात्र संताप व्यक्त केला आहे. एका फेसबूक अकाउंंटवरुन शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

या व्हिडिओमध्ये (Viral VIdeo) तुम्ही पाहू शकता की एक भाऊ शेतामध्ये उभा आहे तर दुसरा भाऊ ट्रॅक्टरवर बसला आहे. दोघांमध्ये चांगलाच वाद सुरू असल्याचे यामध्ये दिसत आहे. हा वाद वाढत जातो आणि ट्रॅक्टरवर बसलेला भाऊ दुसऱ्या भावाच्या अंगावर ट्रॅक्टर घालतो. ट्रॅक्टरवर बसलेला भाऊ दुसऱ्या भावाला ट्रॅक्टरने रेटत घेवून जात असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

इथे पाहा भयंकर व्हिडिओ...(https://www.facebook.com/reel/269830612217932)

या भयंकर घटनेची ही दृश्ये कोणाच्याही काळजाचा थरकाप उडवतील अशीच आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो व्हिव्यूज मिळाले आहेत. ज्यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काही जणांनी या भावावर कठोर कारवाईची मागणी केली आहे, तर काही जणांनी जमिनीचा तुकडा इतका महत्वाचा वाटतो का असे म्हणत आपला संताप व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT