Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : मुंबईत मद्यधुंद चालकाकडून लोकांच्या जीवाशी खेळ; व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांकडून कारवाई

Viral Video : सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक अंधेरीतील थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एका मद्यधुंद चालकांकडून लोकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियाच्या जगात तरुणापासून ते प्रत्येकजण लोकांपर्यत पोहोचण्यासाठी अनेक मार्ग शोधत असतात. यात कधी रिल्स आणि सोशल मीडियाच्या नादात अनेक व्यक्तींचा बळी गेल्याच्या अनेक घटना समोर आतापर्यंत समोर आल्या आहेत. मात्र तरीही तरुणाईंमध्ये याचा कोणताही फरक पडताना दिसत नाही.

सोशल मीडियावर असाच एक अंधेरीतील व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणं एका तरुणाच्या अंगलट आलं आहे. सध्या पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. पंरतू आता अंधेरी पोलीस या स्टंटबाज तरुणावर काय कारवाई करणार याची प्रत्येकाल प्रतिक्षा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा अंधेरीतील असल्याचे समजते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, एक महामार्ग दिसून येत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा दिसत आहे. अशात तुम्ही नीट पाहिले तर एक सफेद रंगांची कार दिसून येत आहे. मात्र याच कारमधील चालक चक्क धावत्या कारच्या दरवाज्याबाहेर उभा राहून स्टेअरिंग पकडत कार चालवत आहे. यात हा कार चालवणारा तरुण मद्यधुंद अवस्थेत होतो. संपूर्ण प्रकार त्यात रस्त्यावरील एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

अंधिरेतील व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इस्टाग्रावरील @saamtvnews

या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ शेअर होताच नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केल्या आहेत,त्यातील एका यूजरने कमेंटबॉक्समध्ये लिहिले आहे की,' महाराष्ट्रामध्ये नक्की काय सुरु आहे,' अशा अनेक प्रतिक्रिया नेटकरी वर्गातून येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT