Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भररस्त्यात रोडरोमियोंचा धुमाकूळ! महिलांची लूटमार आणि छेड काढली; VIDEO

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेली घटना अतिशय संतापजनक आहे. असे नक्की काय घडले ते एकदा व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Sambhajinagar News – संभाजीनगर शहरात महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणे शिवाय छेडछाट करणे अशा घटना वाढू लागल्या आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतीच समोरे आलेले एक सीसीटीव्ही फुटेज या सर्व धक्कादायक समस्येचे गांभीर्य अधोरेखित करते. जे फुटेज सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

संभाजीनगर शहरातील बन्सीलाल नगर परिसरात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. जिथे रस्त्यावरून पायी जाणाऱ्या महिलांवर मोटारसायकलवरून आलेल्या तरुणांकडून छेडछाड करण्यात आलेली आहे. सध्या त्याचा एक सीसीटीव्ही (Cctv) व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये रस्त्यावरून जात असताना मागून मोटरसायकलून येणाऱ्या तरुणांनी हाताचा स्पर्श करून पुढे निघून गेले. हे असेच प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याची तक्रार त्या परिसरातील नागरिकांची आहे. आता याकडे पोलीस लक्ष देणार का हा प्रश्न आहे.

हा व्हिडिओ (Video) सध्या युट्युबवरील saamtv या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हैराण झालेला असून यावर अनेक लोकांनी आपली मत व्यक्त केलेली आहे. त्यातील काही यूजर्संनी कडक कारवाई करण्यात यावी असे म्हटलं आहे तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkani Sweet Dishes : कोकण स्पेशल वडे; 'या' फळाचा करतात वापर, घरी एकदा ट्राय कराच

Maharashtra Live News Update: राजकीय गुंडांनंतर नाशिक पोलिसांचा मोर्चा आता खंडणी वसूल करणाऱ्या गुंड आणि अवैध सावकारांकडे

Fridge Cleaning : तुमच्या फ्रिजमधून दुर्गंध येतोय? तर वाचा हे सोपो घरगुती उपाय

'Bigg Boss 19'मध्ये शॉकिंग एलिमिनेशन; २ सदस्यांचा पत्ता कट, नीलमसोबत 'हा' स्ट्राँग सदस्य जाणार घराबाहेर

Cyclone Alert : महाराष्ट्रावर नव्या वादळाचं संकट? पुढील २४ तास महत्त्वाचे, सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT