Russian model viral video saam tv
व्हायरल न्यूज

Russian model viral video: जवळ आला, हात लावण्याचा प्रयत्न केला आणि...! लगट करणाऱ्याला रशियन महिलेने शिकवला धडा

Russian model viral video: सोशल मीडियावर एका रशियन मॉडेलचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये रील शूटदरम्यान एका व्यक्तीने अयोग्य स्पर्श केल्याचा आरोप आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सोशल मीडियावर सध्या एका रशियन मॉडेलचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतेय. या व्हिडिओमध्ये रील शूट करत असताना एका व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर मॉडेलने त्या व्यक्तीला जाब विचारत मारहाण केल्याचं दिसून आलं. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर महिलांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा सुरू झालीये.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मोनिका नावाची रशियन मॉडेल रील शूट करत होती. यावेळी ती कॅमेऱ्यासमोर उभी राहून व्हिडिओ रेकॉर्ड करत असतानाच अचानक एक व्यक्ती तिच्या जवळ आला. व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने तिच्याशी चुकीचं वर्तन करून तिला अयोग्य पद्धतीने हात लावल्याचं पाहायला मिळतंय. त्यानंतर मॉडेल रागाच्या भरात त्या व्यक्तीला मारहाण केली आहे.

या घटनेचा संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला असून तो व्हिडिओ काही तासांतच विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आला.

सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर याबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झालीये. अनेक युजर्सनी मॉडेलने केलेल्या कृत्याचं समर्थन केलंय. यावेळी काहींनी कमेंट करत लिहिलंय, 'महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांना असा धडा शिकवला पाहिजे.' तर काहींनी 'तिने स्वतःचा बचाव केला हे योग्यच आहे,' असं मत व्यक्त केलंय.

महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत

या व्हिडिओच्या व्हायरल होण्यामागे केवळ घटना नाही तर सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेबाबत असलेली चिंता देखील कारणीभूत आहे. सोशल मीडियावर सतत अशा प्रकारच्या घटनांचे व्हिडिओ समोर येत असल्याने महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होतोय.

(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Messy Braid Hairstyle For Long Hair: लांब केसांवर शोभून दिसेल 'मेसी वेणी', लग्नात तुम्हीच दिसाल सुंदर

Instagram Down : अचानक इंस्टाग्राम झालं ठप्प, रील प्रेमींचा जीव टांगणीला, भन्नाट मीम्सचा पाऊस

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

Jalgaon: महाराष्ट्र हादरला! ४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, आई घरात नसताना नातेवाईकाचं भयंकर कृत्य

Grow coriander at home: घरच्या कुंडीत नीट कोथिंबर उगवत नाहीये? या सोप्या टीप्सचा करा वापर

SCROLL FOR NEXT