russian girl dance in temple viral video x
व्हायरल न्यूज

Viral : घोर कलयुग! मंदिरात नाचवली रशियन तरुणी, Video पाहून लोक संतापले

Viral Video : एका व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. या व्हिडीओमध्ये एका मंदिरात रशियन तरुणी डान्स करत असल्याचे दिसते. या प्रकारामुळे लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

Yash Shirke

Viral Video News : सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक रशियन तरुणी मंदिरामध्ये डान्स करत असल्याचे पाहायला मिळते. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील अलीगड जिल्ह्यातील खेरेश्वर महादेव मंदिरातला असल्याची माहिती समोर आली आहे. मंदिर परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली बार डान्सर्सना नाचवले जात असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खेरेश्वर महादेव मंदिरात रशियन बार डान्सर्संना एका कार्यक्रमासाठी बोलावण्यात आले होते. त्यांचा मंदिरामध्ये नाचतानाचा, अंगप्रदर्शन करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कार्यक्रमाचे आयोजक, आसपासचे लोक अश्लील नृत्याचा आनंद घेत असल्याचेही पाहायला मिळते.

छठपूजेच्या जत्रेदरम्यान खेरेश्वर महादेव मंदिरात सांस्कृतिक क्रार्यक्रमांसाठी बांधलेल्या स्टेजवर बार डान्सर्सना नाचवण्यात आले. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. मंदिरात अश्लील नृत्य कार्यक्रम आयोजित करुन धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे अनेकजणांनी म्हटले आहे.

या ठिकाणी छठ पूजेच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या जत्रेमध्ये यापूर्वीही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पण यावेळेस आयोजकांनी थेट बार डान्सर्सना मंदिरात अश्लील नृत्य करायला लावले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांवर जोरदार टीका होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lemon Benefits: जेवणात लिंबू पिळून खाण्याचे फायदे काय आहेत?

Maharashtra Live News Update: पनवेल मध्ये भाजपचा उमेदवार बिनविरोध

Chocolate Coated Strawberries : सोशल मिडीया ट्रेंड स्ट्रॉबेरी डेसर्ट चॉकलेट घरच्या घरी कसे बनवायचे? वाचा सोपी रेसिपी

Pune BJP Candidate List: नातेवाईकांना डावललं, निष्ठावंतांना संधी; पुण्यात भाजपने कुणाला दिली संधी?, वाचा उमेदवारांची संपूर्ण यादी

Robotic surgery: रुग्ण मुंबईत तर सर्जन शांघायमध्ये...! ५००० किमी दूरवरून करण्यात आली भारतातील पहिली क्रॉस-बॉर्डर रोबोटिक शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT