Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

Shocking Video: मोबाईलच्या अति वापरामुळे भररस्त्यात एक धक्कादायक अपघात घडलेला आहे. नक्की काय झाले पुढे ते पाहा.

Tanvi Pol

Shocking Accident Video: सोशल मीडियावर आपल्याला अनेक धक्कादायक अपघाताचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. मग घडलेले अपघात व्यक्तींच्या निष्काळजीपणामुळे घडतात तर मोबाईलच्या अति वापरामुळे अपघात घडतात. सध्या सोशल मीडियावर असात एका अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नक्की अपघात कसा घडला ते तुम्ही पाहा.

व्हायरल(Viral) होत असलेल्या तुम्हाला दिसेल की, एका कार चालकाने संपूर्ण प्रवास मोबाईमध्ये कैद करण्यासाठी कारमध्ये कॅमेरा लावलेला आहे. या कॅमेऱ्यामुळे रस्त्यावरील संपूर्ण येणारी-जाणारी वाहने मोबाईमध्ये कैद होत आहे. काही वेळ व्हिडिओत(Video) काही समजून येताना दिसत नाही मात्र काही वेळात कार काही अंतर पुढे जाते त्यात एक तरुण स्कुटीवरुन येत असतो परंतू तरुणाचे लक्ष स्कुटी चालवताना मोबाईमध्ये असल्याने तरुण धावत्या स्कुटीसह कारवर येऊन जोरदार आदळतो.

तरुणाचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असून तो व्हिडिओ एक्सवरील ''@gharkekalesh'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करुन कॅप्शनमध्ये,''गाडी चालवताना फोनकडे पाहू नका'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ कुठला आहे आणि कधीचा आहे हे समजू शकलेले नाही मात्र सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगात व्हिडिओला नेटकऱ्यांनी पाहिले आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला पाहून अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''एकतर हेल्मेट नाही, मुर्खांमुळे असे अपघात बहुतेक वेळा होतात'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''जास्त लागले नाही भावाला मात्र पुढच्या वेळीपासून मोबाईल गाडी चालवताना वापरणार नाही'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,'' यांना काही समजत नाही का'' तर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange: मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उद्या एकटेच मुंबईला येणार; पुढच्या आंदोलनाचा संपूर्ण प्लान सांगितला

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरी गणरायाचे उत्साहात आगमन; गणपतीसमोर साकारला कृषीचा खास देखावा

Skin Care: चेहऱ्याची काळजी घेताना नकळत करता 'या' चुका करू नका; हळू हूळ चेहरा पडेल काळा आणि डल

High Court : विद्यार्थ्यांना दिलासा! शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Ramayan Jai Jai Ram Song: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 'रामायण'ची खास भेट; रणबीर-साई पल्लवीचं 'जय जय राम' गाणं रिलीज

SCROLL FOR NEXT