Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Girls Fight Video : कॉलेजच्या आवारात तरुणींची सिनेस्टाईल हाणामारी; एकमेकींना लाथाबुक्क्यांनी तुडवलं, पोरं फक्त बघतच राहिली

Girls Fighting Video: सोशल मीडियावर सध्या काही तरुणींच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ सध्या नेटकरी वर्गात मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरलेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर कायम शाळेतील तर कधी कॉलेजमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आपल्यापैंकी प्रत्येकाने शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना मित्रासोबत वाद तर कधी चक्क हातापायी केलीच असेल. मात्र अनेकदा असं असायच की हाणामारी करणारे तरुण मुलंच असायची, मुली या शांत असत. परंतू सोशल मीडियावर आता एक तूफान हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यात चक्क कॉलेजच्या तरुणींमध्ये भररस्त्यात तूफान हाणामारी होताना दिसून येत आहे.

काय घडले?

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ (Video)तुम्हाला अनेक कॉलेजच्या विद्यार्थींनी अर्थात तरुणी दिसून येत आहेत. त्या प्रत्येक तरुणीने कॉलेजचा गणवेश परिधान केलेला आहे. व्हिडिओत पुढे एका परिसरात अनेक तरुणी एकत्रित दिसत आहेत. काही वेळातच यांच्यात दोन ग्रुप पडतात आणि जोरदार हाणामारी होण्यास सुरुवात होते. मात्र व्हिडिओ एक महिला साडी परिधान केलेली दिसत आहे जी तरुणीची हाणामारी(Fighting) सोडवत आहे की त्यांना मारत आहे हे समजून येत नाही.

तरुणींचा व्हिडिओ सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. जो की एक्स या प्लॅटफॉर्मवरील ''@gharkekalesh'' या अकाउंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत व्हिडिओ च्या कॅप्शनमध्ये,''कॉलेच्या आवारात तरुणींचा जोरदार हाणामारी'' हे लिहिण्यात आलेले आहे. व्हीडिओ पोस्ट होताच नेटकऱ्यांनी मोठी पसंती दिलेली आहे शिवाय अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया

एक्स प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी गंमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत शिवाय सोशल मीडियावर याआधीही अनेक तरुणींच्या हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने प्रतिक्रिया केलेली आहे की,'' काय राव तरुणी'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' काही नवीन नाही'' तर तिसऱ्या एका यूजरे लिहिले आहे की,'' अजून जोरात हाणायला पाहिजे होते'', अशा अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT