Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: चोरीचा नवीन फंडा! स्कुटीवरून कुंडी चोरणाऱ्या महिलेचा VIDEO व्हायरल

Shocking Theft Video: सोशल मीडियावर सध्या एका विचित्र चोरीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात चोरी करणारा कोणता पुरुष नाही आहे तर एक महिला आहे, चोरी कुठल्या वस्तूची झाली पाहा.

Tanvi Pol

Viral News: सोशल मीडियावर आजवर अनेक चोरीच्या घटना व्हायरल झालेल्या आहेत. अनेकदा या घटना सामान्य असतात तर कधी अतिशय धक्कादायकही असतात. चोरी झाल्यानंतर जे व्हिडिओ व्हायरल होतात ते पाहून प्रत्येकजण हैराण होतो, त्यातच सध्या एका चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होतो, जो सीसीटीव्ही पाहून प्रत्येकजण डोक्याला हात मारत आहे. नक्की काय घडले असेल या व्हायरल व्हिडिओत ते एकदा तुम्ही पहा.

नेमके काय घडले?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत सुरुवातीस एक महिला स्कुटी घेऊन जाताना दिसते, मात्र काही वेळात ती एका घराबाहेर स्कुटी घेऊन थांबते. सुरुवातीस व्हिडिओ पाहून सर्व सामान्य सुरु आहे असे वाटेल मात्र काही वेळात ती महिला ज्या घराबाहेर स्कुटीवर थांबलेली असते ती स्कुटीवरुन उतरते अन् घराबाहेर असलेली झाडांची कुंडी उचलते आणि स्कुटीवर ठेवून निघून जाते. संपूर्ण चोरीची घटना घराबाहेर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये(CCTV) कैद झाली आहे.

व्हायरल होत असलेली घटना नेमकी कुठली आहे हे समजू शकलेले नाही मात्र संपूर्ण सीसीटीव्ही व्हिडिओ 'एक्स' प्लॅटफॉर्मवरील ''@gharkekalesh'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कधीचा आहे हेही समजले नाही आणि महिलेने कुंडी का चोरली असेल तेही कळाले नाही मात्र व्हिडिओला नेटकऱ्यांनी मोठी पसंती दिलेली आहे तर अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत असून नेटकरीवर्गातून अनेक प्रतिक्रिया ही आलेल्या आहेत. त्यातील काही यूजर्संनी कमेंटबॉक्समध्ये लिहिले आहे की,'' काय कराव राव'' तर अनेकांनी ''कारण तरी काय असेल'',अशा प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT