Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अरे देवा...! भरधाव वेगात आलेल्या स्कुटीला गाय धडकली, तरुणी जोरात आपटली, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका भयानक अपघातचा व्हिडिओचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. नक्की अपघात कसा घडला ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

सोशल मीडियावर कायम आपल्याला कायम अपघातांचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. अनेकदा घडलेले अपघातांची कारण वेगवेगळी असतात. मग कधी व्यक्तींच्या निष्काळजीपणामुळे मोठे अपघात होतात तर कधी वाहनांच्यामध्ये प्राणी आल्याने असे अपघाच घडतात. सध्या सोशल मीडियावर अशा एका अपघाताच्या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नक्की अपघात कसा घडला आणि पुढे काय झाले ते व्हायरल व्हिडिओतून पाहा.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, रस्त्याच्या कडेला काही गायी चालताना दिसत आहे तर त्याच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एकच गाय आहे. व्हिडिओत पुढे पाहिले तर दिसेल की, जी रस्त्याच्या कडेला एक गाय आहे ती अचानाक रस्त्याच्या मधून पलीकडे जात असते मात्र त्या दरम्यान रस्त्यावरुन एक दुचाकीवरुन महिला येत असते, मात्र वाहनाचा वेग आणि गाय अचानकमध्ये आल्याने गायीची धडक महिलेच्या गाडीला लागते आणि महिला फरफटत रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडते. त्यानंतर सर्व गायी घाबरुन तिथून पळून जातात. सर्व घटना कुठली आहे हे समजू शकलेले नाही मात्र ती घटना रस्त्याच्या कडेला असलेल्या सीसीटीव्हीमध्ये(CCTV) कैद झालेली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्स अर्थात ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील @gharkekalesh या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ २६ ऑक्टोबर रोजी पोस्ट केल्यानंतर मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी पाहिला आहे तर अनेकांनी बऱ्याच प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''कहीही वाहन हळू चालवा'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''हे काही नवीन नाही'' तर अनेकांनी लिहिले आहे की,''जोरदार लागले असेल तर आणि अनेकांनी लिहिले आहे की,'' असं कोणाच्या बाबतीत होउ नये'' अशा अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अधिवेशनापूर्वी सरकारकडून चहापान

Paneer Starter Recipes: पनीरचे ७ आयकॉनिक स्टार्टर, एकदा खाल तर खातच राहाल

Shocking : जन्मदात्या बापाचं हैवानी कृत्य; पोटच्या मुलीवर सलग ३ वर्ष बलात्कार

Sharara Designs: लग्न किंवा पार्टीसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी आणि सुंदर शरारा डिझाईन्स, तुम्ही दिसाल सगळ्यात फॅशनेबल

२८ वर्षांच्या तरुणीचं ६० वर्षीय मॅनेजरशी सूत जुळलं; दोघांनी पळून जाऊन लग्न केलं, फोटो व्हायरल झाल्यानंतर कुटुंबीयांमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT