Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: सेल्फीच्या नादात महिलेला ट्रेनची जोरदार धडक; व्हायरल VIDEO पाहून नेटकऱ्यांना धक्का

Shocking Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत महिलेसोबत काय घडते ते पाहून प्रत्येकजण हैराण झालेला आहे. तुम्ही एकदा व्हिडिओ पहाच .

Tanvi Pol

Viral News: गेल्या काही वर्षात सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढलेला आहे. सोशल मीडियाचा अतिवापर अनेकांच्या मृत्यूचे कारण ठरलेला आहे तर अनेकांना गरीबीपासून प्रसिद्ध पर्यंतही पोहचवला आहे. सोशल मीडियावरही सोशल मीडियावर रिल्स व्हिडिओ बनवण्याच्या नादात अनेकांनी जीव गमवावा लागला असून त्याचे अनेक व्हिडिओही व्हायरल झालेले आहेत,त्यातच सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यात सेल्फी घेण्याच्या नादात जोरदार ट्रेनची महिलेला धडक बसलेली आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एक पर्यटन स्थळ दिसून येत आहे. या स्थळावर अनेक पर्यटक दिसत असून काहीजण कुटुंबासोबत फोटो काढत आहे तर अनेकजण विविध गोष्टी कॅमेऱ्यात कैद करत आहे. या ठिकाणी एक रेल्वे ट्रॅकही आहे. काही वेळात रेल्वे ट्रॅकवरुन एक ट्रेन जाणार असते,ट्रेन सोबत सेल्फी काढण्यासाठी एक महिला रेल्वे ट्रॅकच्या जवळ उभी राहेत आणि सेल्फी घेत असते, मात्र ट्रेनपासून लांब उभी नसल्याने पाठून येणाऱ्या ट्रेनची महिलेला जोरदार धडक बसते अन् ती महिला खाली कोसळते,परंतू पुढे काय घडते ते समजू शकलेले नाही.

सोशल मीडियावर या आधीही धोकादायक ठिकाणी सेल्फी घेताना अनेकांनी जीव गमवावा लागला आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलेले नाही मात्र सध्या इन्स्टावरील ''someguypostingsomestuff'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.

व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर व्हिडिओला अनेक लाईक्स मिळाले आहे तर मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहेत. एवढेच नाही तर व्हिडिओमधील घटना पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रियाही नेटकरी वर्गातून आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''काय गरज असते'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,''सुधारणार नाहीत'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smartphone Care Tips : फोनच्या स्क्रीनवर Liquid Detected चा इशारा येतो? मग टाळा या ७ चुका

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ताफ्याला रस्त्यावर पडलेल्या खड्यांचा बसला फटका

शोल्डर बॅग्सच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स; प्रत्येक आउटफिटला देतील स्टायलिश लूक

आदिवासी महिलेसोबत सामूहिक बलात्कार; नवऱ्याला शोधायला गेली अन् शेतात सापडला मृतदेह

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार, सर्वसामान्याचं टेन्शन वाढलं; वाचा तुमच्या शहरातील लेटेस्ट दर

SCROLL FOR NEXT