Comedy Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Comedy Video: भरमांडवात मित्रांनी केलं 'मोये मोये', नवरदेवाला हसू आवरेना, नवरीचे एक्सप्रेशन तुम्हीच पाहा, VIDEO

Wedding Viral Video: सोशल मीडियावर सध्या मोये मोये गाण्याचा ट्रेंड व्हायरल होत आहे. कोणाची फजिती झाल्यावर हे गाणे वाजवले जाते. हाच ट्रेंड एका लग्नात करण्यात आला आहे. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Moye Moye Trend In Wedding Video Viral:

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात लग्नातील अनेक व्हिडिओ असतात. लग्नातील डान्सचे, गाण्याचे व्हिडिओ असतात. अनेकदा तर लग्नात मित्रमंडळी प्रँक करतात. असाच एक लग्नातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सध्या मोये मोये हा ट्रेंड व्हायरल होत आहे. एखाद्याची फजिती झाल्यावर हे गाणे वाजवले जाते. हाच ट्रेंड एका लग्नात नवऱ्याच्या मित्रांनी केला आहे. (Viral News In Marathi)

अनेकदा लग्नात नवरदेवाचे मित्रमंडळी काहीतरी प्रँक करतात. मध्यंतरी लग्नाच्या आहेरात झाडू, बादली अशा सर्व वस्तू द्यायचा ट्रँड व्हायरल झाला होता. त्यानंतर आता लग्नात मोये मोयेचा ट्रेंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत लग्नसोहळा सुरू आहे. लग्नात मंगलाष्टका सुरु असतात. नवरा- नवरी एकमेकांना हार घालतच असतात. तेच एका बाजूने नवऱ्याचे मित्र मोठ्याने मोये मोये ओरडतात. त्यावेळी नवरा हळूच गालात हसतो. तर नंतर मस्करी केल्याने नवरी एकदम रागात लूक देते. याचाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. लग्न केल्यामुळे नवरा अडकला असल्याचे त्याच्या मित्रांचे म्हणणे असावे. त्यामुळेच त्यांनी मोये मोये म्हटलं असावं.

khandakezzzzz या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओवर खतम, टाटा, बाय, बाय असं कॅप्शन देण्यात आले आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'वहिणीचा शेवटचा लूक' अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर अनेकांनी असा ट्रेंड लग्नात करु नये, असे म्हटले आहे.

Edited By: Siddhi Hande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठीच्या मुद्द्यावर शिंदे गटात फूट, निरुपम मराठीद्वेष्ट्या भय्यांच्या पाठीशी, संतापलेल्या मनसैनिकांची निरुपमांच्या गाडीवर दगडफेक

बेंजामिन नेतान्याहू यांना ट्यूमर; इराणसोबतच्या हाय-व्होल्टेज चर्चेआधी पंतप्रधानांचा मेडिकल रिपोर्ट समोर; जगभरात खळबळ

Maharashtra News Live Update: आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं

Sev puri chutney recipe: शेवपुरीसाठी स्ट्रीट स्टाईल चटपटीत तिखट चटणी कशी तयार कराल?

भाजपच्या मोर्चात गिरीश महाजनांवर भडकलेल्या महिलेविरोधात झेन सदावर्ते मैदानात; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT