Viral Video Of Monkey Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video Of Monkey: टोपीवाल्याच्या गोष्टीची आठवण! माकडाची एक्सचेंज पॉलिसी; iPhone केला परत, VIDEO

Viral Video: माकड हा प्राणी खूप जास्त खोडकर असतो. मंदिरात किंवा एखाद्या घाटात माणसांकडच्या खाण्याच्या वस्तू खेचताना माकडे दिसतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून टोपीवाल्याच्या गोष्टीची आठवण येते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video Of Monkey Returns IPhone In Returns Fruit Drink:

माकडे ही खूपच जास्त खोडकर असतात. अनेकदा मंदिरात किंवा घाटात माकडे दिसतात. ही माकडे माणसांकडून फळ किंवा खाण्याची वस्तू खेचून घेतात. यावेळी टोपीवाल्या माकडांची गोष्ट आठवते.अशीच एका घटना वृदांवनमध्ये घडली आहे. टोपीवाल्या माकडांनी जशा टोप्या खाली फेकल्या होत्या. तशाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Viral News In Marathi)

व्हायरल व्हिडिओत (Viral Video) एका माकडाने चक्क फळाच्या बदल्यात आयफोन परत दिला आहे. यामुळेच टोपीवाल्याच्या गोष्टीची आठवण झाली. टोपीवाल्या माकडाच्या गोष्टीत जसं टोपीवाल्याचे अनुकरण करत माकडांनी टोप्या खाली फेकल्या होत्या. तसंच एक माकडाने एका फ्रुटीच्या बदल्यात आयफोन खाली फेकला आहे.

व्हायरल व्हिडिओत माकडे मंदिराच्या कट्ट्यावर बसलेले दिसत आहेत. त्यातील एका माकडाने एका व्यक्तीचा आयफोन घेतला होता. त्यानंतर माणसाने आपली चतुर बुद्धीचा वापर करत माकडाकडे एक फ्रुटीचा पॅक फेकले. तर माकडाने हातातील आयफोन खाली फेकला. आणि खाली अभा असलेल्या माणसाने आयफोन झेलला. ही घटना मशुरेतील वृदांवन येथील श्री रंगनाथ जी मंदिरात घडली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

sevak_of_krsna या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'माणसाची चतुर बुद्धी', 'टोपीवाल्या गोष्टीची आठवण झाली', अशा कमेंट्स आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

SCROLL FOR NEXT