Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अनोखा जुगाड! पठ्ठ्याने चक्क मोबाइलसाठी बनवलं चप्पलेचं स्टँड; व्हिडीओ पाहून नेटकरीही चक्रावले

Jugad Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. मात्र सध्या एका तरूणाचा व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात त्याने मोबाईल चार्जिंगवर ठेण्यासाठी भन्नाट आयडिया शोधली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात. व्हायरल होत असलेल्या अनेक व्हिडिओमधून मनोरंजन होते तर कधी नवीन गोष्टी शिकण्यास मिळतात, असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होत असतात. अशातच एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यातून एका तरुणाने घरात जुगाड केलेला आहे. सध्या तरुणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरदिवशी अनेक कामामधून सोपा मार्ग शोधणाऱ्या कल्पनांचे व्हिडिओ (Video) आपल्याला पाहायला मिळतात. सोशल मीडियाच्या भाषेत या भन्नाट कल्पनांना जुगाड म्हणून ओळखले जाते. याआधी सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर आपण असे जुगाडू व्हिडिओ पाहिले आहे. सध्या व्हायरल (Viral)होत असलेला व्हिडिओत तरुणाने नक्की काय जुगाड केलेला आहे ते तुम्ही एकदा पहाच.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला घरातील एक खोली दिसत आहे. या व्हिडिओच्या पुढे तुम्हाला एक स्विच बोर्ड दिसत आहे. स्विच बोर्डच्या बाजूला एक चप्पल भिंतीला अडकवली आहे. मात्र तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की स्विच (Switch) बोर्डच्या बाजूला चप्पल का अडकवली असेल? परंतू व्हिडिओ पूर्ण पाहिला तर समजेल की, तरुणाच्या हातात एक मोबाईल आहे जो त्याला चार्जिंगला लावायचा आहे शिवाय त्याच्या दुसऱ्या हातात चार्जर (Charger) आहे. पुढे तो चार्जर स्विचबोर्डला लावतो आणि मोबाईल तो भिंतीवर अडकवलेल्या चप्पलवर ठेवून देतो.

तरुणाचा जुगाडू व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील ''@ maximum_manthan's profile picture'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. सात दिवसापूर्वी व्हिडिओ पोस्ट होताच आतापर्यंत १ लाखांच्या घरात नेटकऱ्यांनी व्हिडिओला पंसती दिलेली आहे तर मोठ्या प्रमाणात व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहेत शिवाय व्हिडिओ पाहून अनेकांनी गंमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत,त्यातील एका यूजरने लिहिले आहे की, ''वा बेटा...'' तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,'मस्त कल्पना...', अशा अनेक प्रतिक्रिया (Comments) केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

९५ CCTV पाहून पोलिसही दमले! ७ घरफोड्यांचा मास्टरमाईंड अखेर कचाट्यात सापडला

Maharashtra Live News Update : नागपुरात गोव्याचे पंप सतत 8 व्या दिवशीही बंद

Crime News: ऑनलाईन ओळख, लग्न आणि गळफास...! लग्नाच्या एका महिन्यानंतर सॉफ्टवेयर इंजिनिअरची आत्महत्या, वाचा काय प्रकरण

Gold Rate: सोनं चमकलं! सोन्याच्या दरात २०८०० रुपयांनी वाढ, सुवर्णनगरीत आजचे दर किती?

भोंदू खरातचा लग्नाचा कारनामा; हळदीच्या वेळी अंगावरचा शर्ट काढत नव्हता, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT