Viral Video  Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे! कलिंगडाएवढा मोठा लिंबू, डोळ्यांवर विश्वास बसणार नाही;VIDEO एकदा पाहाच

Viral News: लिंबू म्हटल्यावर पिवळसर गोल आकाराचा लिंबू असे प्रत्येकाच्या मनात येते. साधारणत, लिंबाचा आकार हा लहान असतो. परंतु तुम्ही कधी कलिंगडाएवढा मोठा लिंबू पाहिला आहे का? असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video Of Unique Lemon:

जगात प्रत्येक देशात, राज्यात वेगवेगळ्या प्रकारची फळे उगवतात. त्यात प्रत्येक देशात लिंबू पाहायला मिळतात. लिंबू म्हटल्यावर पिवळसर गोल आकाराचा लिंबू असे प्रत्येकाच्या मनात येते. साधारणत, लिंबाचा आकार हा लहान असतो. परंतु तुम्ही कधी कलिंगडाएवढा मोठा लिंबू पाहिला आहे का? नसेलच. परंतु परदेशात एक महिलेच्या झाडाला विचित्र आकाराचा लिंबू उगवला आहे. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (latest News)

परदेशातील एका महिलेने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात महिलेच्या एक मोठ्या आकाराचे एक फळ दिसत आहे. हे कोणते फळ नसून लिंबू आहे. लिंबाचा आकारदेखील गोल नसून वाकडातिकडा असल्याचे दिसत आहे. हा लिंबू साधरण लिंबूपेक्षा दहापट मोठा असल्याचे दिसत आहे. महिला हा विचित्र आकाराचा लिंबू कापताना दिसत आहे. लिंबू कापल्यावर त्याच्या आतून रस खाली पडताना दिसत आहे. लिंबाच्या आकारासारखाच आतील भागदेखील वाकडा तिकडा असल्याचे दिसत आहे. या लिंबाला डेव्हिल फ्रुट असे नाव दिले आहे.

@MAXISKITCHEN या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्याक आला आहे. माझ्या लिंबाच्या झाडावर अनोखा लिंबू उगवला आहे, असं कॅप्शन या व्हिडिओवर दिले आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'हा नक्की लिंबूच आहे ना?' 'लिंबू २.० व्हर्जन', 'बापरे कलिंगडाएवढा लिंबू', अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT