Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: उन्हाच्या लाटेत थंडगार मजा! वाघीणीची आपल्या पाच बछड्यांसह पाण्यात मस्ती

Viral tiger video Maharashtrs: सोशल मीडियावर अनेक प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्याही व्हायरल होत असलेला व्हिडिओ काही प्राण्यांचा आहे. पण हा व्हिडिओ प्रत्येकाच्या मोठ्या पसंतील आलेला आहे.

Tanvi Pol

Nagpur Viral Video: नागपूर जिल्ह्यातील उमरेड क-हांडला अभयारण्यात राहणारी प्रसिद्ध F-2 वाघीण सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. तिचा आणि तिच्या पाच गोंडस बछड्यांचा तलावात पाण्यात मस्ती करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उन्हाच्या कडाक्यापासून थोडा आराम मिळवण्यासाठी वाघीण आणि तिचे बछडे तलावात शांतपणे वेळ घालवताना दिसत आहेत. या दृश्याने अनेकांचे मन जिंकले आहेत.

नागपुरातील वन्यजीवप्रेमी (Wildlife lover) श्वेता अंबादे यांनी हा व्हिडिओ घेतला आहे. गोठणगाव गेटवर सफारी करताना त्यांनी हा व्हिडिओ चित्रित केला. उष्णतेचा मानवाबरोबर जंगलातील वन्य प्राण्यांनाही बसत आहे. त्यामुळे वन्य प्राणी ही तलावात किंवा एखाद्या पाणवठ्यावर पाण्यात बसून असतात.

व्हिडिओला मोठी पसंती

F-2 वाघीण आणि तिचे बचतही असे पाण्यात मस्ती करत असताना हा व्हिडिओ आहे. सध्या F 2 वाघीण आणि तिच्या 5 बछड्यानी पर्यटकांच्या आकर्षणच केंद्र ठरत आहे. हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओला अनेक लाईक्स आणि व्ह्यूज मिळत आहेत.

फक्त इन्स्टाग्राम नाही तर अन्य माध्यमांवरही व्हिडिओला (Video) पसंती मिळत असून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने म्हटलं की,''बरं झालं कधीतरी वेगळा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,''क्वचित असं काही पाहण्यासाठी मिळत'' अशा प्रकारे प्रत्येकाला हा व्हिडिओ अतिशय आवडलेला आहे.

टीप: अभयारण्यातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Shortage: गॅसचा तुटवडा; रेल्वेतील खाद्यसेवा बंद| VIDEO

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

गॅस सिलिंडरचा तुटवडा, हॉटेल व्यावसाय अडचणीत, अखेर घेतला मोठा निर्णय, वाचा नेमकं केलं काय?

Reliance 300 Billion Deal: मुकेश अंबांनींची अमेरिकेत ३०० अब्ज डॉलरची गुंतवणूक; सुरु करणार ऑइल रिफायनरी| VIDEO

LPG cylinder : कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद, कोल्हापूरमध्ये गॅस सिलिंडरची नेमकी स्थिती काय? वाचा

SCROLL FOR NEXT