Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: ना जिवाची भीती, ना पोलिसाचा धाक! हायवेवर सुसाट दुचाकीवर केला जीवघेणा स्टंट

Bike Stunt Video: सोशल मीडियावर वारंवार तरुणाईचे हैराणजनक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. अनेकदा हे व्हिडिओ पाहून संताप अनावर होतो तर कधी चिंता व्यक्त होते. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ असाच काहीसा आहे.

Tanvi Pol

Dangerous bike stunt: सध्या तरुणाईमध्ये वेगाची नशा आणि स्टंटबाजी करण्याची प्रचंड क्रेझ वाढत आहे. सोशल मीडियावर काही दिवसांसाठी प्रसिद्द होण्यासाठी अनेकजण कोणत्याही प्रकारच्या सुरक्षिततेचा विचार न करता स्टंट करतात. स्टंटचा धोका त्यांच्यासाठी नव्हे, तर इतर वाहनचालकांसाठीही मोठा असतो. अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात दोन युवक हायवेवर दुचाकीवर स्टंटबाजी करताना दिसत आहेत.

हायवेवर जीवघेणी स्टंटबाजी!

व्हायरल(Viral) झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक युवक हाताने दुचाकी चालवत आहे तर काही वेळाने ती दुचाकीचे पहिले टायर हवेत उंचावतो आणि दुचाकी अतिशय वेगात चालवत आहे. धक्कादायक म्हणजे त्या तरुणाच्या पाठी अजून एक तरुण बसलेला आहे. रस्त्यावर वेगाने धावणाऱ्या इतर वाहनांमध्ये तरुण असे कृत्य करत असताना बघून बरेचजण भयभीत झाले आहेत.

तरुणांच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ सर्वत्र पाहिला जात असून तो व्हिडिओ इन्स्टाच्या ''__immu_64'' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. त्यातील काही यूजर्संनी तरुणांच्या धाडसाचे कौतुक केले आहे तर काहींनी तीव्र शब्दात राग व्यक्त केलेला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखो लोकांनी लाईक्स दिलेले असून असंख्य लाईक्सही मिळालेले आहेत.

सोशल मीडियावर यापूर्वीही अनेक असे व्हिडिओ (Video) व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये तरुणांची स्टंटबाजी पाहण्यासाठी मिळाली आहे. अनेकदा तरुणांना स्टंटबाजी करत असताना स्वत:च्या जीवाला मुकावे लागले आहे तर बऱ्याचदा इतरांनाही त्यामुळे इजा झालेल्या आहे. मात्र, सध्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून त्या तरुणांवर कारवाई करण्यात यावी असे सांगितले आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसादाच्या गुंगीतून लैंगिक शोषण; SITच्या चौकशीत अशोक खरातचे भयंकर कारनामे उघड, VIDEO

Iran-Israel War: इराणच्या ४०० किलो युरेनियमवर अमेरिकेचा डोळा, अमेरिकन सैन्याचा मास्टर प्लॅन काय?

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, पाळीव कुत्राही दगावला

ठाकरेंचं मराठीप्रेम निवडणुकीपुरतंच? निवडणुकीनंतर मराठी अस्मितेला तिलांजली, VIDEO

Jalna: अवकाळी पावसाचा हाहाकार, अंगावर वीज कोसळून २ तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT