Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मुंबई लोकलमध्ये नळावरील भांडण; महिलांमध्ये बाचाबाची, शा‍ब्दिक शिवीगाळ, Video Viral

Tanvi Pol

Local Train Viral Video: सोशल मीडियावर कायम आपल्याला बरेच अतरंगी व्हिडिओ पाहण्यास मिळतात. मग जास्तीत जास्त व्हिडिओहे मुंबईलमधील लोकल ट्रेनचे असतात. मग काय मुंबई लोकल ट्रेनचे व्हिडिओ कायमच नेटकऱ्यांच्या पसंतीस येत असतात. अशाचत परत एकदा मुंबई लोकल ट्रेनमधील व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात महिलांचे जोरदार वाद होताना दिसून येत आहेत.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत मुंबई लोकल ट्रेन दिसून येत आहे. मात्र व्हिडिओत मुंबईच्या लोकल ट्रेनमधील कंपार्टमेंट दिसून येत आहे. लेडीज कंपार्टमेंटमध्ये महिलांची गच्च गर्दी दिसत आहे. व्हिडिओत पुढे पाहिले तर दिसेल की काही महिलांमध्ये काही वाद सुरु आहे. व्हिडिओतील महिलांची वाद ऐकून समजेल की जागेच्या कारणांवरुन काही महिला एकमेंकीसोबत वाद(Fighting) घालत आहेत.

महिलांच्या भाडंणाचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील "@gharkekalesh'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला असून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,'' मुंबई लोकलमध्ये सीटच्या कारणावरुन काही महिलांमध्ये वाद''. व्हिडिओ साधारण १६ ऑक्टोंबर रोजी पोस्ट केलेला असून आता पर्यंत व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहे तर अनेक लाईक्स मिळालेले आहे.

मुंबई लोकलमधील महिलांचा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्संनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''बस, मेट्रो किंवा ट्रेन कुठेही पाहिल्यास महिलांना त्यांच्या जागेसाठी नेहमीच संघर्ष करावा लागतो.

काही जण घरातून सीट आणल्यासारखे वागतील. अरे भाऊ, जागा मिळाली तर बसा, नाही मिळाली तर स्टेशन येण्याची वाट बघा...किंवा सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे बुक करा... तुम्ही प्रत्येक जागा भाजी मंडईत बदलून टाका'' अशी भलीमोठी प्रतिक्रिया केलेली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' काय सांगता आम्हाला या बद्दलच काही माहिती नाही'' तर बऱ्याच नेटकऱ्यांनी लिहिले आहे,''हाणामारी होता होता राहिली''.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मुंबईत मविआची बैठक, जागा वाटपावर चर्चा

Maharashtra Navnirman Sena : मनसे अॅक्शन मोडवर; ठाण्यातून उमेदवारी देणार

IND vs NZ 1st Test: फुल ऑन राडा! मोहम्मद सिराज LIVE सामन्यात कॉनव्हेला भिडला- VIDEO

Diwali 2024 : दिवाळीत फटाके फोडताना चिमुकल्यांची 'अशी' घ्या काळजी, नाहीतर...

Ticket Reservation : प्रवाशांसाठी दिवाळीचं मोठं गिफ्ट; रिजर्वेशनसाठी फक्त ६० दिवस आधी तिकीट बूक करता येणार

SCROLL FOR NEXT