Delhi Mtero Viral Video: दिल्ली मेट्रो म्हणजे कायम नेटकऱ्यांच्या चर्चेत असणारा विषय. कधी दिल्ली मेट्रोत भयानक हाणामारी होते तर कधी हैराण करणाऱ्या गोष्टी घडतात. सध्या सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोमधीलच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यात प्रवाशांमध्ये झालेली हाणामारी पाहण्यासाठी मिळत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत(Video) तुम्हाला दोन पुरुष प्रवाशी एकमेंकासोबत वाद घालत आहे. मात्र या वादाचे रुपांतर हाणामारीत होते. या पुरुष प्रवाशांमध्ये एक तरुण आणि तर दुसरा मध्यम साधारण वयस्कर व्यक्ती आहे. मात्र या झालेल्या हाणामारीचे नेमके कारण समजू शकलेले नाही मात्र सर्व प्रकार मेट्रो(Delhi Metro)मधीस एका प्रवाशांने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.
दिल्ली मेट्रोचा व्हिडिओ ''एक्स'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून ''@gharkekalesh'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. शिवाय पोस्ट करत कॅप्शनमध्ये ''दोन प्रवाशांमध्ये हाणामारी''असे लिहिण्यात आलेले आहे. सध्या व्हिडिओला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहे तर अनेक लाईक्सही मिळाल्या आहेत.
सोशल मीडियावर वारंवार दिल्ली मेट्रोचे व्हिडिओ व्हायरल होत असतात मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला पाहून बऱ्याच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''नक्की कारण काय'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''करा अजून हाणामारी''तर काहींनी गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.