Viral Accident Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: भरधाव येणाऱ्या रेल्वेचा तरूणाला लागला धक्का; पुढे काय झालं? काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Viral Accident Video: सोशल मीडियावर आपल्याला एकापेक्षा एक भयंकर अपघाताचे व्हिडिओ पाहायला मिळतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Young man Accident Video

सोशल मीडियावर आपल्याला एकापेक्षा एक भयंकर अपघाताचे व्हिडिओ पाहायला मिळतात. जे पाहून भल्याभल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. सध्या अशाच एका भयंकर अपघाताच्या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. .('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

देशभरात सध्या अपघातांच्या अनेक घटना समोर येत आहेत. कधी चालकांच्या निष्काळजीपणामुळे तर कधी रेल्वेच्या धडकेत अनेक अपघात होत असतात. प्रवाशांचा छोटासा निष्काळजीपणा मृत्यूचे कारण ठरते. सध्या अशाच एका भयंकर अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात एक व्यक्तीला रेल्वे रूळ ओलांडताना भरधाव येणाऱ्या रेल्वेची धडक लागते. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा उभा राहिलं.

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video)आपण पाहू शकतो की, व्हिडिओत सर्व रेल्वे स्टेशनचा परिसर दिसत आहे. आजूबाजूला अनेक प्रवाशी रेल्वे रूळ क्रोस करत आहेत तर रेल्वे रूळाच्या काही अंतरावर वस्तू विक्रेतेही आहेत.

एवढ्यातच एक भरधाव रेल्वे येत असते त्यामुळे अन्य लोक रेल्वे जाण्याची वाट पाहतात जेणे करून पलीकडे जात याव. मात्र यामध्ये एक व्यक्ती भरधाव रेल्वे येत असतानाही रेल्वे रूळ ओलांडत आहे. ट्रेन येताना पाहूनही तो आरामशीर चालत आहे. शेवटी भरधाव येणाऱ्या रेल्वेचा त्या व्यक्तीला धक्का लागतो. धक्का लागताच तो व्यक्ती उडून दुसरीकडे फेकला जातो.

या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. अपघाताचा व्हिडिओ एक्स अॅपवरील @1000waystod1e या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. प्रत्येक नेटकऱ्याने या व्यक्तीचा निष्काळजीपणा केल्यानेच हा अपघात झाल्याचे म्हणले आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत. तर अधिक लोकांनी लाईक केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT