Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: रॉंग साईड वाहन चालवण आलं अंगलट; व्हायरल VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप

Andhra Pradesh Viral Video: एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात चुकीच्या बाजूने येणाऱ्या वाहन चालक थेट कारला जाऊन धडकला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Accident Video

देशभरात वाहतुकीच्या नियमांचं मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असते. अनेकवेळा परिवहन विभागाकडून वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येते. पंरतू नागरिक नियमाचे पालन करताना दिसत नाही आणि अनेकवेळा वाहतुकीचे नियम न पाळल्याने अनेक थरारक अपघात होत असतात. अशातच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात चुकीच्या बाजूने येणाऱ्या वाहन चालक थेट कारला जाऊन धडकला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, रस्त्याच्या दोन्ही मार्गावरुन वाहनांची ये-जा होताना दिसते. काही वेळानंतर एक कार सरळ मार्गाने वेगात जात असते आणि तितक्यात चुकीच्या दिशेने एक वाहन चालक येत असतो. मग काय वेगात जाणाऱ्या वाहनावर समोक येणारा वाहन चालत येऊन धडकतो. भरधाव वेगात येऊन धडकल्याने कारची समोरील काच तुटली गेली आहे.सुदैवाने या अपघातात तरुणाला कोणतीही गंभीर जखम झाली नाही.

संबंधित व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवरील@RoadsOfMumbai या पेजवर पोस्ट शेअर करण्यात आला आहे. या आधीही वाहतुकीच्या नियमाच उलंघन केल्याने अनेक मोठे अपघात झाले आहेत. सर्व घटना कारमधील असलेल्या मोबाईलमध्ये कैद झाली आहे. मात्र अशा प्रकारे वाहतुकीच्या नियमांचे उचित पालन न करणे अत्यंत धोक्याचे आहे.

सर्व घटना आंध्र प्रदेशमधील असल्याची समजते.व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून तरुणावर कारवाईची मागणी केली आहे. अशा बेशिस्त वाहनचालकांमुळेच अपघात होतात, असे नेटकऱ्यांनी म्हणले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA Home : सर्वसामान्यांच्या स्वप्नांना ब्रेक! म्हाडाच्या घरांची दिवाळीतील सोडत रखडली, जाणून घ्या कारण

Maharashtra Live News Update : मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्रालयात आज दोन महत्त्वपूर्ण बैठका

Pune : पुण्यातील भिडे पूल आजपासून पुन्हा वाहतुकीसाठी बंद | VIDEO

UPI च्या नियमांत ५ दिवसात मोठे बदल; थेट तुम्ही करत असलेल्या ट्रान्झॅक्शनवर परिणाम; वाचा सविस्तर

Asia Cup : संजू सॅमसन, कुलदीपला डच्चू? पहिल्या सामन्यात अशी असेल भारताची प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT