Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: 'लॉर्ड बॉबी'सारखा डान्स, जमाल कुडू गाण्यावर शिक्षक थिरकले, शाळेतल्या धिंगाण्याचा व्हिडीओ व्हायरल

Dance Video: सोशल मीडियावर सध्या काही शिक्षकांचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी वर्गात चर्चेचा विषय ठरलेला आहे मात्र शिक्षकांवर कारवाई करण्यात आलेली आहे.

Tanvi Pol

Teacher Viral Video: गेल्या काही महिन्यापूर्वी 'जमाल कूडु' या गाण्याने अनेकांनी वेड लावले होते. लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत प्रत्येकजण यावर रील्स व्हिडिओ बनवत असे. मग काय सध्या या गाण्यावरील काही शिक्षकांचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे,मात्र यात शिक्षकांना जमाल कूडु गाण्यावर डान्स करणं महागात पडलेले आहे.

नेमके काय घडले?

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ उत्तर प्रदेशातील हापूर जिल्हातील आहे. जिथे एका शाळेतील शिक्षकाला शिक्षकाला शाळेत डान्स केल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. सध्या सर्व व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''abpnewstv'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्हाला दोन शिक्षक दिसत असून दोघंंही जमाल कुडू या गाण्यावर शाळेतच डान्स करताना दिसत आहे. डान्स करताना त्या दोघांनीही जमाल कुडू या गाण्यात डोक्यावर ग्लास ठेवून डान्स करतात, तसा डान्स केलेला आहे. या दोघांचा डान्स तेथील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये शूट केलेला आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया कमेटबॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्यातील पहिल्या एका यूजरने लिहिले आहे की,हा कदाचित त्यांचा घरचा व्हिडिओ असेल'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,''गुरुजी मजा करत आहेत'' तर अजून एका यूजरने लिहिले,''हे मास्टर आहेत की हे सगळे गुंड आहेत'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : शिक्षकांचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How To Make Puffed Poori: हॉटेलसारख्या फुगलेल्या आणि मऊ पुरी बनवायच्या? फॉलो करा 'या' ७ सोप्या टिप्स

Maharashtra Rain Alert : पुढील ५ दिवस महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार; अनेक जिल्ह्यांना अलर्ट

हॉटेलच्या रुममध्ये पांढऱ्या बेडशीटच का असतात, काळ्या रंगाच्या का नाही? कारण काय?

फक्त ‘अब्बा-अम्मा’ म्हणणाऱ्या बालकाला पोलिसांनी ९० मिनिटांत पोहोचवलं आई-वडिलांकडे

Sunday Horoscope : व्यवसायात लाभ होईल, 6 राशींच्या व्यक्तींचा रविवारचा दिवस कसा असणार? वाचा संपूर्ण राशीभविष्य

SCROLL FOR NEXT