Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: दिल्ली मेट्रोत भयंकर राडा! तरुणाला लाथा बुक्क्यांनी मारलं, हाणामारीचा VIDEO व्हायरल

Delhi Metro Viral Video: सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. नक्की आता काय घडले असेल मेट्रोत तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Delhi Metro Viral Video: सोशल मीडियावर कायम दिल्लीमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असता. मग कधी दिल्लीमधील बसमध्ये महिलांची हाणामारी तर कधी दिल्ली मेट्रोमध्ये कपलचे अश्लील कृत्य, मात्र जास्तीत जास्त व्हिडिओ हे दिल्ली मेट्रोमध्ये झालेल्या प्रवाशांच्या तूफान हाणामारीचे असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात मेट्रोमध्ये काही व्यक्ती एका तरुणाला तूफान हाणताना दिसत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला दिल्ली मेट्रो दिसत आहे. या मेट्रोत प्रवाशांची मोठी गर्दी आहेत, अशातच एका व्यक्तींचा मेट्रोमधून गोंधळ करण्याचा आवाज येतो,मात्र तुम्ही पाहिले तर दिल्ली मेट्रोत काही व्यक्ती एका तरुणाला लाथा-बुक्क्यांनी मारताना दिसत आहे. मेट्रोमधील बाकी प्रवाशी फक्त होत असलेली हाणामारी पाहत आहेत मात्र त्यातील एका प्रवाशाने संपूर्ण मारामारीची(Fighting) घटना मोबाईलमध्ये कैद केलेली आहे.

होत असलेल्या हाणामारीचे नेमके कारण कळू शकलेले नाही, मात्र दिल्ली मेट्रोतील व्हिडिओ ''एक्स'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो एक्सवरील ''@gharkekalesh'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांच्या प्रचंड चर्चेत आलेला असून व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहे. परंतू व्हिडिओ कधीचा आहे हे समजू शकलेले नाही.

·

एक्स प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच यूजर्संनी प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातील पहिल्या यूजरने लिहिले आहे की,''दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करणे म्हणजे अनेकांचे मनोरंजन'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''दिल्ली मेट्रो हे आता मनोरंजनाचे केंद्र बनले आहे, मग तो डान्स पाहणे असो की कुणाची धुलाई, रोज कुठली ना कुठली गोष्ट त्यात पाहायला मिळते'', अशा अनेक प्रतिक्रिया नेटकरी वर्गातून आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kaas Pathar : फुलांनी बहरलेले नंदनवन, 'कास पठार 'चं सौंदर्य पर्यटकांना खुणावते

Karisma Kapoor: दिवाळी स्पेशल करिश्मा कपूरच्या बोल्ड साडी लूक पाहून चाहाते घायाळ, PHOTO व्हायरल

Dhanashree Kadgaonkar Photos: मन तळ्यात मळ्यात.. जाईच्या कळ्यात, टिव्हीच्या वहिनीसाहेबाचं सौंदर्य खुललं

ट्रेकिंग करताना पक्षाघात, पण ८४ वर्षीय करवंदे काका हरले नाहीत; १७०६ वेळा सर केला सिंहगड किल्ला!

Snake Hidden Inside Scooter: अरे बापरे बाप! स्कुटीला स्टार्टर मारणार तोच फुसफुसला, हेडलाइटमध्ये लपला होता विषारी साप, VIDEO

SCROLL FOR NEXT