Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: पांढरी टोपी अन् पांढरा पोशाख, संबळच्या तालावर ठेका धरत थिरकले काका; VIDEO तुफान व्हायरल

Dance Viral Video: सोशल मीडियावर काही पुरुषांच्या संबळ या पारंपारिक गाण्यावरील धुनवर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यातील विविध पट्ट्यानुसार भाषा अन् परंपरा बदलत जातात. बऱ्याच भागात आपल्याला लग्नाच्या कार्यक्रमातील विधी आणि गाणीही सुद्धा बदलताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात महाराष्ट्रातील एका भागातील प्रसिद्ध गाण्यावर काही व्यक्ती डान्स करताना दिसत आहेत. तुम्हीही याआधी व्हायरल व्हिडिओतील गाण्यावर ताल नक्कीच धरला असेलच.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत संबळवर डान्स (Dance) करत आहे. सोशल मीडियावर आपल्याला प्रत्येक वेळी अनेक हिंदी गाण्यावर असो मराठी गाण्यावर डान्स करताना दिसतात. मग डान्स करण्याचे कारणही क्षणाक्षणाला बदलतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील एका गावाकडील दिसत आहे. ज्यात अनेक पुरुषांनी मिळून धमाकेदार डान्स केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ आपल्याला अनेक पुरुष मडंळी दिसून येत आहेत. प्रत्येकाने डोक्यावर पांढरी टोपी आणि पांढरा शर्ट परिधान केलेला आहे. एका बाजूला संबळ वाजवणारी मंडळी दिसत आहेत तर एका बाजूला अन्य पुरुष. ज्या क्षणी संबळ (Sambal)वाजण्यास सुरुवात होते, तेव्हा तिथे असलेला प्रत्येकजण नाचण्यास सुरुवात करतो. व्हिडिओत तुम्हाला डान्स करणाऱ्या व्यक्तींचा उत्साह काही न्याराच दिसून येईल.

व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्म ''@pankaj.bagul20'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हायरल व्हिडिओ नाशिक जिल्ह्यातील असल्याचे समजून येते. व्हिडिओ व्हायरल होताच तब्बल १३ हजारपेक्षा अधिक नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेले आहे शिवाय अनेक प्रतिक्रिया (Feedback) आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''एकच नंबर'' तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,'' वा.. अगदी छान''.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT