Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: म्हारी छोरियां छोरों से कम हैं के! चिमुकलीचा लाठी-काठीचा उत्साह भन्नाटच, व्हिडीओ पाहून तुम्हीही कौतुक कराल

Viral News: सोशल मीडियावर सध्या काही चिमुकल्या मुलींचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रत्येक नेटकरी वर्गातून त्यांचे कौतुक होत आहे.व्हिडिओत नक्की काय आहे ते पहाच.

Tanvi Pol

सोशल मीडिया म्हणजे असंख्य व्हिडिओ व्हिडिओंचा खजिना. सोशल मीडियावर चिमुकल्यांचे असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी हटके डान्स, कधी शाळेतील मस्तीने चिमुकले लक्ष वेधत असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा धाडसी व्हिडिओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

साडी घातलेली ही चिमुकली अत्यंत सफाईदारपणे शिवकालीन मर्दानी खेळ (Games) खेळताना दिसत आहे. तिचे हे कौशल्य पाहून नेटकरीही अवाक झालेत.चिमुकलीच्या या कलेला लाठी-काठीचा खेळ असे म्हणतात.भल्या-भल्याना जमणार नाही असे कौशल्य या चिमुकलीकडे पाहून दिसून येते.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला अनेक लहान चिमुकल्या दिसत आहेत.प्रत्येकीने नववारी साडी नेसलेली आहे.जर तुम्ही व्हिडिओत नीट पाहिले तर प्रत्येक चिमुकली लाठी-काठी ही कला सादर करत आहेत.लहान वयात चिमुकल्याचा उत्साह आणि अतिशय व्यवस्थित लाठी-काठी चालवताना पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

चिमुकलीचा व्हिडिओ सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे,मात्र तो एक्सवरील '@JaipurDialogues'या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.विशेष म्हणजे व्हिडिओ पोस्ट करण्यात आल्यानंतर कॅप्शनमध्ये,''प्रत्येकाने आपल्या मुलींना अशा प्रकारे प्रशिक्षण दिले पाहिजे'',असे लिहिले आहे.

सोशल मीडियावर चिमुकलीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांच्या पंसतीस आलेला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कौतुकास्पद प्रतिक्रिया केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेटबॉक्समध्ये लिहिले आहे,''नारी शक्ती''तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले,''कमाल तायडे'' तर अनेक यूजर्संनी लिहिले आहे,''साहेब पोरी खूप बदलल्या आहेत'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक दिवस हिजाब घालणारी महिला भारताची पंतप्रधान होईल; खासदार औवेसींचा दावा

Fashion Tips: उंचीने कमी असलेल्या मुलींनी उंच दिसण्यासाठी फॉलो करावयाच्या ७ ड्रेसिंग टीप्स

Maharashtra Live News Update: वाशिमच्या रेल्वे स्टेशन परिसरात अज्ञात महिलेच्या डोक्यावर दगड घालून हत्या

KTM RC 160: धूम मचाले धूम..! ताशी ११८ किमीच्या स्पीडनं बाईक धावेल सुसाट; KTM RC 160च्या फीचससह लुक आहे खास

Marine Drive police rescue: जिवाची बाजी लावून पोलिसांनी केलं रेस्क्यू; महिलेला मृत्यूच्या दाढेतून काढलं बाहेर, Video सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT