Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: व्हिडिओसाठी धाडस पडलं महागात! रील्सच्या नादात तरुण थेट शौचालयाच्या भांड्यात आपटला;  VIDEO व्हायरल

Shocking Stunt Video: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुणाईमध्ये वेगळी एक स्पर्धा झाली आहे. अनेकदा धोकादायक रील्स बनवणे त्यांना आवडीचे झाले आहे. मात्र त्यातील एका तरुणाला रील्स व्हिडिओ बनवणे महागात पडले आहे.

Tanvi Pol

Boy Falls in Toilet: सध्याच्या डिजिटल युगात प्रत्येकावर सोशल मीडियाचा प्रभाव वाढत आहे. विशेष तरुणाईमध्ये इन्स्टाग्राम आणि फेसबुक यासारख्या प्लॅटफॉर्मवर रील्स व्हिडिओ बनवणे हा एक सामान्य ट्रेंड बनला आहे. मात्र अनेकदा रील्स करण्याच्या नादात भयंकर अपघातही घडतात. सध्या एका तरुणाला उत्साहाच्या भरात रील्स करणं महागात पडले आहे, ज्यात तरुण रील्स करण्याच्या नादात थेट शौचालयाच्या भांड्यात कोसळला आहे.

रील्स करताना तरुणासोबत घडलं भयंकर!

व्हिडिओत तुम्हाला एक तरुण एका शौचालयाच्यावर उभा असलेला दिसत आहे. ज्यात त्याच्या हातात एक प्लास्टिकचे घमेल आहे. त्यानंतर तरुण रील्स(Reels) व्हिडिओ शूट करण्यासाठी डान्स करत आहे. उत्साहात तरुण डान्स करताना अचानक शौचालयाचा स्लॅब कोसळतो आणि तरुण थेट शौचालयात जोरदार कोसळतो. सर्व थरार रील्स व्हिडिओ शूट करत असताना कॅमेऱ्यात कैद झालेला आहे.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral)झालेला असून काही क्षणात याला लाखो नेटकरी वर्गातून लोखांचे व्ह्यूज मिळाले आहे तर हजारो लाईक्सही मिळालेले आहेत. हा व्हिडिओ ''lokvruttanews'' या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही व्हिडिओ नेटकरी वर्गातून शेअर करण्यात आलेला आहे.

तरुणाचा स्टंट व्हिडिओ इतका व्हायरल झाला की नागरिकांकडून विविध प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''कधी काय घडेल ते सांगता येत नाही'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''अतिशय भयंकर प्रसंग आहे'' तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

टीप: तरुणाचा हा स्टंट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: खरात प्रकरणामुळे अजित पवार गटातील आणखी एक महिला नेत्या विरोधकांच्या रडारवर; राजीनाम्याची केली मागणी

Elphistone Bridge: मध्य रेल्वेवर ६ दिवस मेगा ब्लॉक; लोकलचं वेळापत्रक बदलणार; तुमच्यावर काय परिणाम होणार?

IPL 2026: पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; चेन्नईची थेट सहाव्या स्थानावर, पहिल्या नंबरवर कोण?

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या मेळघाटात मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाला अपघात,दोन मजुरांचा मृत्यू

Haldi Yellow Saree Designs: हळदीला नव्या नवरीने ट्राय करा या सुंदर ट्रेंडी पिवळ्या साड्या, पाहा ७ युनिक डिझाईन्स

SCROLL FOR NEXT