Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: तरुणाईच्या डोक्यात रील्सचे खूळ! तरुणीची सुस्साट ट्रेनमध्ये जीवघेणी स्टंटबाजी; VIDEO व्हायरल

Dangerous Stunt Video: सोशल मीडियावर सध्या एका स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण संताप व्यक्त करत आहे.मात्र पुढे काय घडतं ते एकदा पाहाच.

Tanvi Pol

Passenger Stunt Video: सोशल मीडियावर वारंवार तरुणाईचे स्टंटबाजीचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात.अनेकदा काही तरुणांना स्टंटबाजीमध्ये जीव गमवावा लागतो तर काही गंभीर जखमी होतात,मात्र असे स्टंटबाजीचे प्रकार थांबत नाही.सध्या अशाच एका स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाची व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात ती धावत्या ट्रेनच्या दरवाजात लटकून स्टंट करताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हायरल व्हिडिओत तुम्हाला एक तरुणी ट्रेनच्या दरवाजात उभी दिसते शिवाय ज्या ट्रेनमध्ये तरुणी आहे त्या ट्रेनचा वेग अतिशय जोरदार दिसत आहे.काही वेळाने ही तरुणी धावत्या ट्रेनच्या दरवाजाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करते त्यानंतर ती एका तरुणाच्या हाताला पकडत दरवाजात उभं राहून लटकते.सर्व धक्कादायक(Shocking) व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

स्टंटबाजीचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील saiba__19 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ नक्की कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही मात्र व्हिडिओला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले असून व्हिडिओला अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही शेअर करण्यात आलेले आहे.

नेटकरी वर्गात व्हिडिओ व्हायरल(Viral) होताच त्यावर अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.त्यातील काही यूजर्संनी कमेंट केली आहे,''तरुणाला काय झाले आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''गरज काय असते अशा स्टंट करायची''तर काही यूजर्संनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप: तरुणीच्या स्टंटबाजी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ड्रीम11चा मोठा निर्णय! लोकसभेत ऑनलाइन गेमिंग विधेयक मंजूर होताच ‘पे टू प्ले’ ऑप्शन रद्द; वापरकर्त्यांना पैसे...|VIDEO

बैलपोळ्याच्या दिवशी शेतकऱ्याची आत्महत्या, विषारी औषध पिऊन आयुष्य संपवलं; कुटुंबीयांकडे अंत्यसंस्कारासाठीही पैसे नाहीत

Maharashtra Live News Update: कोल्हापूर - रत्नागिरी महामार्ग वाहतुकीसाठी खुला

तो आला अन् माझ्या स्तनांना स्पर्श केला, प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला तिच्यासोबत घडलेला भयंकर अनुभव

Online Gaming Scam : प्रसिद्ध अभिनेत्रीच्या जाहिरातीला भुलला, ऑनलाइन गेमिंगमध्ये मुंबईतील बिझनेसमन अडकला, १२ कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT