Viral Vidoe Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Vidoe : नाद करा पण काकांचा कुठे! चक्क डबल-डेकर सायकलवर प्रवास, व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले खूश

Viral Video: आजवर आपण अनेक सायकल पाहिल्या मात्र तुम्ही कधी डबल डेकर सायकल पाहिली आहे का? सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Old Man Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला कायम अतरंगी व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. मग कधी चिमुकल्यांच्या अनोख्या मस्तीचे व्हिडिओ असतील कधी मोठ्या व्यक्तींच्या चक्रावून जाणाऱ्या गोष्टीचे. सध्या सोशल मीडियावर असाच काहीसा व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी मिळत आहे. ज्यात एक काका चक्क डब्बल डेकर सायकल चालवत आहेत.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एक रस्ता दिसून येत आहे. या रस्त्यावर एक काका आहेत जे सायकल चालवताना व्हिडिओत तुम्हाला दिसून येईल. मात्र व्हिडिओ तुम्ही नीट पाहिला तर तुम्हाला ते काका चक्क एक सायकल नाही तर डब्बल डेकर सायकल चालवताना दिसून येत आहे. सायकल अतिशय उंच आहे आणि ते काका उंचावर सायकल चालवत आहे. त्याच रस्त्यावरुन (Road)जाणाऱ्या एका व्यक्तीने काकांचा पराक्रम मोबाईमध्ये कैद केलेला आहे.

आजोबांचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे मात्र तो इन्स्टाग्रामवरील ''@mumbai.hai.bhai_'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''काकांना दोन शब्दात काय सांगायचे आहे?'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर हजारोच्या संख्येने लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत शिवाय अनेक यूजर्संनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''सायकल थांबवल्यावर हे काका खाली कसे उतरतील असा प्रश्न मला पडतो'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''म्हातारपण आले आहे हे काका विसरले असावेत'' अशा अनेक गमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT