Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: पुराच्या पाण्यात ऑरा फार्मिंग डान्स; तरूणाचा व्हिडीओ पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात

Aura Farming Dance Video: मुंबई आणि ठाण्यातील पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत एका व्यक्तीने पाण्यात ऑरा फार्मिंग डान्स केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Manasvi Choudhary

मागील दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले. पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले . जागोजागी पाणी साचल्याने पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. पाण्याच्या पुरातून प्रवास करणे अनेकांना कठीण झाले होते. अशातच सोशल मीडियावर एका व्यक्तीचा पुराच्या पाण्यात अडकल्यानंतर ऑरा फार्मिंग डान्स करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

मुंब्रा येथील एक व्यक्ती पुराच्या पाण्यात ऑरा फार्मिंग डान्स करत आहे. सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ सध्या धुमाकूळ घालत आहे. ऑरा फार्मिंग डान्स हा 'बोट डान्स' म्हणून ओळखला जातो. ११ वर्षीय इंडोनेशियन मुलाने डान्स केल्यानंतर लोकप्रिय झाला आहे. यामुळेच सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीने पावसाच्या पाण्यात केलेला ऑरा फार्मिंग चर्चेत आला आहे.

'मुंब्रा एक्सप्रेस' या इन्स्टाग्राम पेजवर व्यक्तीचा ऑरा फार्मिंगचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 'मीनवाईल मुंब्राकर' अस कॅप्शन दिलं आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती पावसाच्या पाण्यात बुडाल्यानंतर काही मिनिटातच तो ऑरा फार्मिंग डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यात उड्या मारत चटईवर बसताना दिसत आहे. या अनोख्या स्टंटबाजीने सोशल मीडियावर खास लक्ष वेधून घेतले आहे.

सोशल मीडियावर या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्याच्या ऑरा फार्मिंग डान्सचे कौतुक केले आहेत. अनेक नेटकऱ्यांना त्याचा हा प्रकार आवडलेला नसल्याचं दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला

Moringa Ladoo: ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी खा मोरिंगाचे लाडू, वाचा सोपी रेसिपी

अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत; शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी? पाहा VIDEO

Maa OTT Release: थिएटरनंतर काजोलचा 'माँ' ओटीटीवर होणार प्रदर्शित; हा हॉरर चित्रपट कधी आणि कुठे पाहायला मिळणार?

Ajit Pawar : अजित पवार म्हणाले, I Love You Too! पण कोणाला? Video

SCROLL FOR NEXT