Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: आई रिलमध्ये मग्न, चिमुकला पोहचला रस्त्यावर; थोडक्यात अनर्थ टळला; पाहा VIDEO

Viral News: रिल्सचे वेड अनेकदा अपघाताचे कारण ठरते, सध्या सोशल मीडियावर या संंबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Shocking Viral Video: रिल्स काढणे किंवा ब्लॉगिंग करणे सध्या तरुणाईमध्ये लागलेले वेड आहे. कोणत्याही नवीन ठिकाणी गेल्यानंतर रिल्स काढणे महत्त्वाचे झालेले आहे मात्र अशातच गेल्या काही वर्षापासून अनेक अपघात घडून येत आहेत. सोशल मीडियाव सध्या अशीच एक घटनेचा प्रत्यय आणणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नेमके काय घडले ते तुम्ही पाहा.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत एक कुटुंब फिरण्यासाठी आलेले दिसत आहे. ज्यात एका महिलेसह तिची दोन लहान मुलंही आहेत. मात्र अशातच ती महिला एका ठिकाणी मोबाईल फोन ठेवून रिल्स(Reel) बनवत असते आणि तिची दोन मुलं तिच्या बाजूला असतात मात्र काही वेळात त्या दोन मुलांपैकी एक लहान चिमुकला थेट रस्त्याच्या दिशेने जात असतो मात्र त्या महिलेचे लक्ष डान्स करुन रिल्स बनवण्यात असते.

त्यात महिलेचा दुसरा मुलगा तिच्याजवळ जाणून रस्त्यावर जाणाऱ्या चिमुकल्याकडे इशारा करतो. काही क्षणात महिला रस्त्यावर जात असलेल्या चिमुकल्याला पळत जाऊन पकडते. काही क्षणाच्या वेळाने मोठा अनर्थ होण्यापासून टळला जातो. संपूर्ण घटना रिल्स व्हिडिओत कैद झालेली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@gharkekalesh'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,''आई फोनवर रील काढत होती आणि ती लहान मुलगी रस्त्याच्या कडेला पोचणार होती, अचानक तिचा मुलगा आला आणि तिला इशारा केला'', असे लिहिण्यात आलेले आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सुद्धा संतापजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI पेमेंट शुल्कावरून सर्वोच्च न्यायालय ॲक्शन मोडमध्ये; केंद्र सरकारसह RBI आणि NPCI ला नोटीस

Kidney Stones : तुम्हाला किडनी स्टोन झालाय? रोज खा 'ही' ४ हिरवी पाने

Maharashtra News Live Update: दुष्काळाच्या मागणीसाठी शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले; सोयाबीन जाळून निषेध

Gold Rate Today: पितृपक्ष सुरू होताच सोनं-चांदी अचानक स्वस्त! सुवर्णनगरीत मोठी घसरण; वाचा आजचे नवे दर

यायचं असेल तर आमच्यासोबत या! राष्ट्रवादी विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT