Monkey Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Monkey Viral Video: अगं बाई!लालपरीच्या टपावरुन माकडाची शाही सफर; चक्क १७ किमीचा केला प्रवास

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका माकडाचा गमतीदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण नक्कीच हसत आहे. व्हायरल व्हिडिओ नेमके काय घडले पहाच.

Tanvi Pol

Viral Video: सोशल मीडियावर अनेकांच्या माकडांच्या कारनाम्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी घरात जाऊन घरातील खाद्यपदार्थ खाणं असो वा कधी वाघासोबत मस्ती करणं असो,मात्र सध्या अशाच एका माकडाचा व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत चक्क एका माकडाने एसटी बसच्या टपावर बसत प्रवास केलेला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओत धाराशिवमधील असल्याचे समजते.

प्रकरण तरी नेमके काय?

व्हायरल (Viral)होत असलेला व्हिडिओ धाराशिवच्या कळंब तालुक्यातील रांजणी येथील आहे. जिथे कळंब-लातुर फेरी करणाऱ्या एसटी अर्थात लालपरीवर दिमाखात बसून प्रवास केवा आहे. मात्र हा प्रवास तब्बल या माकडाने १७ किलोमीटरपर्यंत पूर्ण केला आह. माकडाने सतरा किलोमीटरच्या प्रवासानंतर बसवरुन उडी मारत बसवरील ताबा सोडलेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला रस्त्यावरुन एक एसटी बस येताना दिसत आहे.मात्र,जशी बस येते सर्वजण बसच्या वर पाहत असतात तुम्हीही बसच्या वर नीट पाहिले तर दिसेल की,चक्क एक माकडा टपावर बसून प्रवास करत येताना दिसत आहे. सर्व गमतीदार प्रसंग तेथील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या 'saamtvnews'या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर लाखोंच्या घरात नेटकऱ्यांनी पाहिला आहे तर अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर ही करण्यात येत आहे.

टीप : माकडाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

Crime News: पुण्यात टोळी युद्धाचा भडका, आंदेकर विरुद्ध कोमकर गँगवॉरला सुरुवात

Asia Cup Hockey 2025 : टीम इंडियाने चौथ्यांदा कोरलं आशिया कपवर नाव; अंतिम फेरीत दक्षिण कोरियाला धूळ चारली

SCROLL FOR NEXT