Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: दबक्या पावलांनी माकडाची एन्ट्री; अंधेरी मेट्रो स्थानकातील तो व्हिडीओ व्हायरल

Andheri Metro Viral Video: मुंबईच्या अंधेरी मेट्रो स्थानकात माकड अचानक शिरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

Manasvi Choudhary

सोशल मीडियावर माकडाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. निसर्गाच्या सानिध्यात असो किंवा मानव वस्तीत माकड हे दिसतात. माकड हा प्राणी अत्यंत हुशार आहे. कधी कधी माकडे हे मानवाला हे देखील वेड बनवतात. असाच एक व्हिडीओ सध्या लक्ष वेधून घेत आहे. मुंबईच्या अंधेरी मेट्रो स्थानकात माकडाने एन्ट्री केली आहे. अत्यंत रूबाबदार अंदाजात माकड चालतानाचा व्हिडीओ आहे.

माकडाची अंधेरी मेट्रो स्थानकात एन्ट्री

माकड हा प्राणी पाहून अनेकांना भिती वाटते. कारण माकड हा माणसांच्या हातातील खाण्याचे पदार्थ घेतो. बिस्किट, केळी हे पदार्थ दिसल्यास माकड ते लगेच खेचून घेतो. अशातच आता मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील डी एन नगर येथील मेट्रो स्थानकात माकड दिसला आहे. माकड पाहून प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. काही वेळ गोंधळ देखील उडाला आहे. दरम्यान तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माकड अगदी ऐटीत चालताना दिसतो आहे. अंधेरी मेट्रो स्थानकात माकड आला आहे. या मेट्रो स्थानकात फारशी गर्दी दिसत नसल्याने माकड आरामात चालत आहे. सोशल मीडियावर माकडाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर माकडाचा मेट्रो स्थानकातील व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यावर अनेकांनी प्रतिक्रिया देखील केल्या आहेत. माकड हा अंधेरी मेट्रो स्थानकात कसा आला याबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महात्मा फुले रुग्णालयच्या पुनर्निर्माणवरून श्रेयवाद रंगला

Mobile Recharge: कमी बजेट? तरीही मिळणार 5G इंटरनेट, Vi चा 'हा' प्लॅन तुमच्यासाठी आहे परफेक्ट

Actress Oops Moment: 'द फॅमिली मॅन ३' फेम अभिनेत्रीचा इव्हेंटमध्ये तोल गेला; पायऱ्यांवरून उतरताना पडली अन्..., VIDEO व्हायरल

Shocking: भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, मध्यरात्री झोपेत असताना जागीच संपवलं

Shocking : चाकूने सपासप वार करत बायकोला संपवलं, नंतर स्वत:ही उचललं टोकाचं पाऊल; कल्याण हादरलं!

SCROLL FOR NEXT