Monkey Attack: सोशल मीडियावर आपल्याला अनेकदा प्राण्यांचे नागरिकांवर हल्ले केल्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. कधी रस्त्यावरुन जात असलेल्या व्यक्तीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला होतो तर कधी बैलांचा. मात्र सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात घराबाहेरील अंगणात बसलेल्या महिलेवर माकडाने जबरदस्त हल्ला केला आहे.
व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही एक महिला अंगणात बसलेली आहे. मात्र ति तिथे बसून भाजी निवडण्याचे आणि कापण्याचे काम करत आहे. काही वेळातच तिथे एक माकड येतो आणि त्या महिलेचे केस अतिशय जोरात ओढतो शिवाय त्याच वेळी तिथे अजून एक माकड येतो आणि पुन्हा त्या महिलेचे केस ओढण्याचे काम करतो. मात्र तिथे घरातून पळत एक व्यक्ती येतो आणि माकडांना पळवून लावतो. संपूर्ण घटना घराबाहेर असलेल्या सीसीटीव्हीत (CCTV)कैद झाली आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही मात्र सर्व व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ ''@gharkekalesh'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.
व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या चर्चेत आलेला आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''बापरे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''काय कराव आता'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''कधी कधी माकडं कारण नसताना असे वार करतात'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.