Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: काळुबाईचं‌ वारं‌ माझ्या‌‌‌ भरलं अंगात...या गाण्यावर मराठमोळ्या नवरीचा भन्नाट डान्स; VIDEO एकदा पहाच

Dance Video: सध्या सोशल मीडियावर हळदीतील डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्या डान्सच्या व्हिडिओ नेटकरी वर्गात मोठ्या पसंतील येत असून तुम्हीही एकदा पहाच व्हायरल व्हिडिओ.

Tanvi Pol

Haldi Ceremony Video: गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र लग्नसराईची धामधुम सुरु आहे. सोशल मीडियावरही तुम्हाला लग्न कार्यातील अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत आहेत. त्यातच सध्या एका उत्साही नवरीबाईच्या डान्सचा धमाल व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तिने स्वत:च्या हळदीत फुल राडा केलेला आहे. सध्या या व्हिडिओला मोठ्या संख्येने नेटकरी वर्गाने पंसती दिलेली आहे.

व्हिडिओ एकदा पहाच

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत सर्वत्र हळदीच्या कार्यक्रमाचा उत्साह दिसत आहे. त्यातच काही वेळात हळदीच्या कार्यक्रमात डीजे वाजण्यास सुरुवात होऊन नवरीसह अनेकजण डान्स करण्यास सुरुवात करतात, मात्र काही वेळातच डीजेवर ''काळुबाईचं‌ वारं‌ माझ्या‌‌‌ भरलं अंगात'' हे गाणं वाजण्यास सुरुवात होते, त्यानंतर नवरीबाई सह तिच्या आजूबाजुला असलेली मंडळी जोरदार डान्स करण्यास सुरुवात करतात. नवीन नवरीही सर्व गोष्टी विसरून अगदी आनंदाने डान्स करताना दिसत आहे, मात्र तुम्ही व्हिडिओ नीट पाहिला तर दिसेल की सर्वात जास्त उत्साह याच नवरीचा आहे. सध्या हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

हळदीच्या कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या ''यूट्यूब'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून त्यात तो ''@sagarruchika'' अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर व्हिडिओला नेटकरी मंडळीने हजारो लाईक्स दिले आहे तर व्हिडिओचे व्ह्यूज ही दिवसेंदिवस वाढत आहे.

नवरीचा बाईचा उत्साह आणि आनंद पाहून व्हिडिओला मोठी पसंती तर मिळत आहे शिवाय अनेक प्रतिक्रिया कमेटबॉक्समध्ये मिळत आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''क्या बात है नवरीबाई'', तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''कडक डान्स'', तर अन्य यूदर्संनी नवरीच्या डान्सचे कौतुक केलेले आहे.

टीप : नवरीच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT