Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: IPS होऊन बाइकने जात होता, पोलिसांनी तरुणाला हटकले, पुढे जे झालं ते विचारही करु शकत नाही... पाहा व्हिडीओ

Shocking Viral Video: सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोज अनेक घटना समोर येत असतात. सध्या बिहारमधील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सरकारी जॉब हव असं आपल्यापैकी प्रत्येकाचे स्वप्न असते. जर पोलिस होण्याचे स्वप्न असेल तर त्यासाठी अनेकजण खूप मेहनत करत असतात. आपल्याला अनेकदा पोलिस भरती करताना अनेक तरुण-तरुणी दिसत असतात शिवाय ते घेत असलेली मेहनत दिसून येते. मात्र सध्या पोलिस वर्दी हवी त्यासाठी एका तरुणाला मोठा चुना लावला गेल्याचे प्रकरण समोर आलेले आहे. सध्या सोशल मीडियावर या तरुणाची मोठी चर्चा होत आहे.

थोडक्यात घटना काय?

बिहार (Bihar)राज्यातील एका तरुणाला मोठा अधिकारी (Officer) बनवतो म्हणून तब्बल दोन लाख रुपयांचा चुना लावला गेला आहे. यानंतर या तरुणाला पोलिसांचा गणवेश दिला गेला शिवाय पोलिस खात्यात जॉईन झाल्याचेही सांगण्यात आले. पण पोलिस (Police) खात्यात जॉईन होण्यापूर्वीच खऱ्या पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे. संपूर्ण धक्कादायक घटना ही बिहार राज्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन व्यक्तींना अटक केली आहे.

नक्की काय घडले?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील तरुणाचे नाव मिथलेश कुमार असून तो अवघ्या १८ वर्षाचा आहे. मिथलेश हा लखीसराय जिल्ह्यातील रहिवासी आहे. काही दिवसांआधी मिथलेशला त्याच्या परिसरात राहणाऱ्या आरोपी मनोज सिंह या अज्ञान व्यक्तीने पोलिस खात्यात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या सर्वांसाठी मिथलेशने आरोपी मनोज सिंहला तब्बल दोन लाख रुपये दिले.

पैसे दिल्यानंतर आरोपीने मिथलेशला खोटी पिस्तुल आणि पोलिसांचा गणवेश दिला. गणवेश मिळाल्यानतर पोलिस खात्यात जॉईन झाल्यानंतर ही आनंदाची बातमी देण्यासाठी मिथलेश आईकडे गेला. दुसऱ्या दिवशी मिथलेश परिसरातील जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये ड्युटी जॉईन करण्यासाठी जात होता. त्या दरम्यान रस्त्यावरुन जात असताना खऱ्या पोलिसांनी मिथलेशला अडवले आणि पोलिस चौकशीसाठी नेण्यात आले. मात्र तेव्हा मिथलेशने पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी मिथलेश आणि त्याला गंडा घालणाऱ्या मनोज सिंहला पोलिसांना तात्काळ अटक केली.

व्हायरल होत असलेली संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हायरल करण्यात आलेला आहे. त्यासाठी तुम्हाला एक्सवरील ''@gharkekalesh'' या अकाउंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. आतापर्यंत व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळत आहेत तर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' काय रे तू'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' भावा मज्जा केलीस तू'' तर अनेकांनी संतप्त तर अनेकांनी गमतीदार प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पार्कमध्ये काँग्रेस नेत्याची हत्या; बॅटनं मारलं अन् गोळ्या झाडल्या, CCTVतून मारेकऱ्याची ओळख पटली

Maharashtra Live News Update: हिंगोली राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद

Cancer Alert: आताच सावध व्हा! नकळत या गोष्टींमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका, अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल

Who is Petal Gahlot: जगासमोर पाकच्या पंतप्रधानांचे तोंड बंद केलं, खडेबोल सुनावणाऱ्या पेटल गहलोत कोण आहेत?

Vastu Tips: शुभ कार्यापूर्वी नारळ का फोडतात? जाणून घ्या शास्त्र

SCROLL FOR NEXT