London Metro Viral Video  Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: लंडनच्या मेट्रोमध्ये भारतीय संस्कृतीचे दर्शन; लाल रंगाचा लेहंग्यात भारतीय तरुणीने केली लंडनस्वारी

Viral Video Of London Metro: भारत देश संस्कृतीने नटलेला आहे. देशात विविध भागात वेगवेगळ्या संस्कृती आहेत. त्यानुसार तेथील पोषाख, खाण्याचे पदार्थ असतात. हीच संस्कृती अनेकदा सातासमुद्रापार पाहायला मिळते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video Of Girl Wearing Bride Attire Roaming On Lonadon Metro And Street:

भारत देश संस्कृतीने नटलेला आहे. देशात विविध भागात वेगवेगळ्या संस्कृती आहेत. त्यानुसार तेथील पोषाख, खाण्याचे पदार्थ असतात. हीच संस्कृती अनेकदा सातासमुद्रापार पाहायला मिळते. भारतीय लोक वेगवेगळ्या देशात भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन करतात. असाच लंडनमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारतात लग्नाला खूप जास्त महत्त्व आहे. लग्नासाठी वर-वधू वेगवेगळे ड्रेस परिधान करतात. लेहंगा, साडी असा लूक नवरी करते. असाच सुंदर लूक करत लंडनच्या मेट्रोमध्ये आणि रस्त्यावर एक तरुणीने फोटोशूट केले आहे. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest News)

लंडनच्या मेट्रोमध्ये एका भारतीय तरुणीने नवरीचा पोषाख घालून फोटोशूट केले आहे. लाल रंगाचा लेहेंगा, त्यावर मॅचिंग ज्वेलरी आणि हेअरस्टाईल असा सुंदर लूक तिने केला आहे. लंडनच्या रस्त्यावर फिरताना, भारतीय संस्कृतीने दर्शन घडवतावा दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये एका तरुणीने लाल रंगाचा सुंदर लेहंगा, त्यावर ज्वेलरी आणि हेअरस्टाईल केलेली दिसत आहे. ती मेट्रो स्टेशनवर उभी असल्याचे दिसत आहे. त्यानंतर ती मेट्रोमध्ये जाते तेव्हा लोकांच्या रिअॅक्शन पाहण्यासारख्या असतात. मेट्रोतील लोकांना तरुणीचा लूक खूपच आवडलेला दिसत आहे. त्यामुळे सर्वजण तिचे कौतुक करताना दिसत आहे. अनेक लोक तिला सुंदर, खूप छान या शब्दात कौतुक करताना दिसत आहे. तसेच लंडनच्या रस्त्यावर ती फिरताना दिसत आहे. तेथेही तिच्या या लूकचं अनेक लोकांनी कौतुक केले आहे.

@shr9ddha या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT