Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: पनवेलमध्ये परप्रांतीयाची दादागिरी; घर खाली करण्यासाठी दबाव; VIDEO व्हायरल

Panvel Viral Video: सोशल मीडियावर सध्या पनवेल शहरातील एका संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात पुन्हा एकदा परप्रांतियांची पनवेलमधील मराठी कुटुंबियावर दादागिरी पाहण्यास मिळाली.

Tanvi Pol

सिद्धेश माह्त्रे,साम टीव्ही

Panvel Shocking News: मुंबई अर्थात मराठी माणसाशी ओळख,मात्र त्याची अवस्था सध्या चिंता जनक झाली आहे.कारण गेल्या काही वर्षापासून मुंबईत परप्रांतीयाची मराठी माणसावर अनेक हल्ले पाहण्यास मिळत आहे.अशातच आता पनवेल मधील भोकरपाडा भागातील हिरानंदानी सोसायटीत परप्रांतीयाची दादागिरी पहायला मिळालेय.

हिरानंदानी सोसायटीत भाड्याने राहणाऱ्या गायकवाड कुटुंबियांना घर खाली करण्यासाठी हिरानंदानी सोसायटीच्या चेयरमन वसुंधरा शर्मा यांच्यामार्फत दबाव टाकण्यात येत होता. गायकवाड यांच्या घराचे अग्रीमेंट संपले असून गायकवाड कुटुंबीय दुसऱ्या घराचा शोध घेत असताना देखील हिरानंदानी मधील घर तात्काळ खाली करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात येतोय. गायकवाड यांना दुसरं घर मिळे पर्यंत घर मालकाने त्याठिकाणी राहण्याची परवानगी (Permission) दिली असताना देखील सोसायटी मधील परप्रांतीय चेयरमन घर खाली करण्यासाठी दबाव टाकत होत्या.

याच दरम्यान चेयरमनच्या दबावामुळे गायकवाड कुटुंबियांतील एका जेष्ठ नागरिकाला हृदयाचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. यादरम्यान गायकवाड कुटुंबाने यासंदर्भात मनसेकडे मागितली दाद मागितली असता मनसेच्या पनवेल महिला जिल्हाध्यक्ष आदिती सोनार आणि मनसे कार्यकर्त्यांनी हिरानंदानी सोसायटी जवळ जाऊन जाब विचारला.

यावेळी आक्रमक झालेल्या मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी परप्रांतीय महिला चेयरमनचा माज मोडत मराठी कुटुंबियाची माफी (Forgiveness)मागायला लावली. यासोबतच चेयरमन वसुंधरा शर्मा यांना पुन्हा अश्या प्रकारची तक्रार आल्यास मनसे स्टाईल धडा शिकवण्याची तंबी देखील मनसेच्या वतीने देण्यात आलेय.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Investment: आता NSE वर शेअर्सप्रमाणे खरेदी करू शकाल सोने; काय आहे EGR? जाणून घ्या फायदे-तोटे

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार, शिवसेनेतील बडा नेता नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Maharashtra News Live Update: अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

SCROLL FOR NEXT