Local Train Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमध्ये तरुणीचा थिल्लरपणा, भोजपुरी गाण्यावरील डान्स पाहून नेटकरी संतापले; VIDEO तुफान व्हायरल

Local Train Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात,त्यातच पुन्हा एकदा जबरदस्त व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,ज्यात तरुणीने लोकल ट्रेनमध्ये धम्माकेदार डान्स केलेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर गेल्या दिवसांपासून ट्रेनमधील तसेच मुंबई लोकल ट्रेनमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. परंतू मुंबई लोकल ट्रेन असो वा बस रील बनवणाऱ्या तरुणांचे ठिकाण बनलेले आहे. अशातच सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात एक तरुणी लोकल ट्रेनमध्ये भोजपूरी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ लोकल ट्रेनमधील(Local Train) आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका तरुणीने निळ्या रंगाचा वनपीस परिधान केलेला आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दीही नसलेली दिसून येत आहे. सुरुवातीस भोजपूरी गाणे सुरु झाल्यानंतर तरुणी डान्स करू लागते मात्र त्यानंतर तिच्यापाठी मागे असलेला तरुणही तिच्यानंतर डान्स करु लागतो.

सोशल मीडियावर याआधी ही अनेक तरुणींचे भर गर्दीत डान्स(Dance) करणारे व्हिडिओ व्हायरल झालेले असून सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहेत.व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर शेअर करण्यात आलेला असून diya_mukherjee_official_या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलेला आहे.

व्हिडिओ पोस्ट(Post) केल्यानंतर हजारोंच्या घरात लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत शिवाय अनेक यूजर्सेंनी गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.परंतू हा व्हिडिओ नक्की मुंबई लोकल ट्रेनमधील आहे का कुठला आहे हे समजू शकलेले नाही.

(टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

Maharashtra News Live Update: महायुतीकडून भाजपाचे अमर राजुरकर यांना उमेदवारी

OBC आरक्षणात कपात होणार? निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश, पाहा का घेतला निर्णय?

Vaibhav suryavanshi: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मालामाल, आलिशान कार आणि मिळाले तब्बल इतके लाख रूपये

Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT